बंगळुरु : सूर्य धगधगणारा आगीचा गोळा आहे. लाखों डिग्री सेल्सियस तापमान असलेला सूर्य पृथ्वीपेक्षा लाखोपटीने मोठा आहे. याला प्लाजमा बॉलही म्हटलं जातं. सूर्याच्या मॅग्नेटिक फील्ड्समध्ये बदल झाल्यानंतर इथे स्फोट होतात. वेळो-वेळी वादळ येत राहतात. स्फोटामुळे सूर्यापासून चार्ज होणारे प्लाज्मा अवकाशात पसरतात. हे चार्ज पार्टिकल अन्य ग्रहांवर जाऊन आदळतात. हे चार्ज प्लाज्मा पृथ्वीच्या दिशेने सुद्धा येतात. पण मॅग्नेटिक फिल्डमुळे पृथ्वीच्या पुष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत. सूर्यापासून जी ऊर्जा निघते, त्यामुळे चंद्रावर खड्डे पडले आहेत. सूर्याची ऊर्जा चंद्राच्या पुष्ठभागावर जाऊन धडकते. भारताने आधीच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून पाण्याचा शोध सुरु केलाय. महत्त्वाच म्हणजे पृथ्वीरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो.
चंद्रावर सलग 14 दिवस सूर्यप्रकाश आणि 14 दिवस रात्र असते. सध्या सूर्यप्रकाश असल्यामुळेच आपल मिशन चांद्रयान सुरु आहे. अनेकदा अवकाशात फिरणारे सॅटलाइट या प्लाज्माच्या समोर येतात. या धडकेमुळे अनेकदा सॅटलाइट पूर्णपणे उद्धवस्त होतात. हजारोंच्या संख्येने हे सॅटलाइट पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत आहेत. चार्ज प्लाज्मा पृथ्वीच्या मॅग्नेटिक फिल्डला भेदून पृष्ठभागाजवळ आल्यास तर सॅटलाइट्सच सुद्धा नुकसान होऊ शकतं. सोलर स्टॉर्म म्हणजे सूर्यावर येणाऱ्या वादळामुळे एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सच कोट्यवधी डॉलरच नुकसान झालय. मागच्यावर्षी स्पेसएक्सने एकाचवेळी 49 सॅटलाइट लॉन्च केले होते. यात 40 सॅटलाइटन सोलर स्टॉर्ममध्ये नष्ट झाले.
जीपीएस, इंटरनेट बंद पडू शकतं
पृथ्वीच्या कक्षेत वेगवेगळ्या उद्देशाने स्थापित असलेले सॅटलाइटस सोलर स्टॉर्मच्या संपर्कात आले, तर पृथ्वीवरील कम्युनिकेशन सिस्टिम बंद पडेल. जीपीएस आणि रेडियो ट्रान्समिशन बंद होईल. इंटरनेट सेवा बंद होऊ शकते. पावर ग्रिडही ठप्प होऊ शकतं. जगात अंधार पसरेल. त्यामुळे अवकाश हवामानाची रियल टाइम माहिती मिळवणं आवश्यक आहे. आदित्य L1 या कामात जगाची मदत करेल. स्पेस लॉन्चिंगला मदत होईल. जगाचे कोट्यवधी डॉलर वाचतील. भारताच्या आदित्य L 1 मिशनला आजपासून प्रारंभ झाला आहे. पुढच्या 125 दिवसात आदित्य एल 1 नियोजित कक्षेत पोहोचेल.