Air strike inside story : भारतीय हवाईदलाचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला अभिनंदन वर्धमानला सोडावं लागलं होतं. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांचे भारताला शांत करण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरत होते अशी परिस्थिती होती. तत्कालीन उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी तत्कालीन घडामोडी उघड केल्या आहेत.
बिसारिया म्हणतात, ‘पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच मी भारतात आलो आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या टीमचा सदस्य होतो. त्यानंतर पाकिस्तानने वैमानिकाला परत न पाठवल्यास भारत हे प्रकरण आणखी वाढवण्याचा प्रयत्न करेल असा संदेश देत होता. आम्ही पाकिस्तानकडून जे काही ऐकत होतो आणि आमचे संभाषण जे काही होत होते, आम्हाला खात्री होती की पायलट परत येईल. कारण पाकिस्तानला माहित होते की त्याचे परिणाम गंभीर होणार आहेत.
इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलायचे होते. पण ते फोनवर उपलब्ध नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने ‘हत्याची रात्र’ तयार केली होती. बिसारिया यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या भाषणात भारताच्या पंतप्रधानांशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले होते.
पाकिस्तानच्या संसदेतही यावर चर्चा झाली, ज्याची माहिती पाकिस्तानी खासदाराला होती. त्यांनी सांगितले की परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि तत्कालीन लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी खासदारांना माहिती दिली होती आणि म्हटले होते की गंभीर संकट उद्भवत आहे आणि भारत कठोर भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला पायलटला परत पाठवावे लागेल.’
एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून देखील भारतात घुसण्याचा प्रयत्न झाला. पण भारतीय हवाई दल देखील तयार होते. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक विमान पाडले. पण त्यांच्या विमानाला देखील आग लागल्याने विमान पाकिस्तानच्या हद्दीतच पडले. मात्र, भारताच्या कठोर भूमिकेमुळे अभिनंदन वर्धमानला काही दिवसांतच सोडून देण्यात आले.