Plastic Currency : देशात सध्या प्लास्टिकच्या नोटांची चर्चा आहे. चलनात प्लास्टिकच्या नोटा येण्याची चर्चा सुरु आहे. २०२८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्लास्टिकच्या नोटांवर अभ्यास सुरू केला होता. तेव्हापासून याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आल्या आहेत. सरकारने सध्या तरी प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. सरकारकडून नेहमीच बनावट नोटांना आळा घालण्याच्या प्रयत्न असतो. पण तुम्हाला माहित आहे की अनेक देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जात आहे. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी देखील हे पाऊल उचलले जावू शकते. प्लास्टिकच्या नोटांचे काही फायदे आहेत तर काही तोटे देखील आहेत. चला पाहुया प्लास्टिकच्या नोटा कोणत्या देशात वापरले जातात?
प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली आहे. त्यामुळे भारतात तरी सध्या प्लास्टिकच्या नोटा येणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. आता आपण जगातील 23 अशा देशांबाबत चर्चा करणार आहोत जेथे प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जातात. यामध्ये 6 देश असे आहेत ज्यांनी त्यांच्याकडच्या सर्व नोटा या प्लास्टिकच्या केल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया १९८८ (पहिला देश)
न्यूझीलंड १९९९
रोमानिया २००५
पापुआ न्यू गिनी १९७५
व्हिएतनाम २००३
ब्रुनेई २००४
– ब्राझील
– चीन
– हाँगकाँग
– इंडोनेशिया
– इस्रायल
– लेबनॉन
– मलेशिया
– मेक्सिको
– नेपाळ
-निकाराग्वा
– पोलंड
– सिंगापूर
– श्रीलंका
– थायलंड
– युक्रेन
– उरुग्वे
प्लास्टिकच्या नोटा या टिकाऊ असतात आणि सहज खराब देखील होत नाहीत. त्या ओल्या झाल्या तरी खराब होत नाहीत. याशिवाय बनावट नोटांना देखील आळा बसतो.
कागदी नोटांपेक्षा प्लास्टिकच्या नोटा महाग असतात. त्या रिसायकल करणे देखील कठीण असतात. प्लास्टिकच्या नोटा या पर्यावरणासाठी हानिकारक असू शकतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2018 मध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरता येऊ शकतात का यावर अभ्यास सुरु केला होता. पण यावर अजून तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.