IND vs PAK | सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर शातंता आहे. पण पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार नाही. कारण सवयीप्रमाणे पाकिस्तान केव्हाही दगाबाजी करुन पाठित खंजीर खुपसू शकतो. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊन चांगलच वठणीवर आणलं आहे. बदल्याच्या आगीमध्ये होरपळणारा पाकिस्तान केव्हाही हल्ला करु शकतो. ती शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानने नुकतीच भारतीय सीमेजवळ एक कृती केलीय. त्यामुळे संशय अधिक बळावलाय. पाकिस्तानने भारतीय सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर एक नवीन एअरफिल्ड बनवलय. त्याशिवाय चीनकडून आयात केलेल्या SH-15SP हॉवित्जर तोपांची तैनाती केलीय. एयरफिल्ड लाहोरच्या जवळ आहे. या एयरफील्डचा वापर कशासाठी होणार? त्या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. नागरी उड्डाणासाठी कि, मिलिट्रीसाठी?
पाकिस्तानच्या या दोन कृतींमुळे चिंता वाढलीय. भारतीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानातील अधिकारी किंवा मिलिट्रीने या बद्दल कुठलही अधिकृत वक्तव्य केलेलं नाहीय. फ्लाइट ट्रेनिंग स्कूलची तयारी सुरु असल्याच काही लोकांच म्हणणं आहे. पाकिस्तानी मिलिट्री याचा वापर करेल. हेलिकॉप्टर, ड्रोन आणि अन्य विमानांसाठी या एअरफिल्डचा वापर होऊ शकतो.
इथून UAV लॉन्च करणं सोपं
सर्वाधिक चिंता वाढवणारी बाब ही आहे की, चीन आणि टर्कीवरुन मागवलेल्या हल्ला करणाऱ्या ड्रोन्ससाठी या एअरफिल्डचा वापर होऊ शकतो. ही एअरफिल्ड भारतीय सीमेपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. इथून भारताविरोधात UAV लॉन्च करणं पाकिस्तानसाठी खूप सोप असेल.
पाकिस्तानला स्वस्तात दिल्या तोपा
पाकिस्तानी सैन्याने आपल्या 28 आणि 32 व्या आर्टिलरी रेजिमेंटसाठी चीनमधून तोपा मागवल्या आहेत. पाकिस्तानने चीनकडून SH-15 Self Propelled (SP) विकत घेतलं. चीनने स्वस्तात या तोपा पाकिस्तानला दिल्या आहेत. या दोन्ही रेजिमेंट पाकिस्तानच्या दुसऱ्या आर्टिलरी डिविजनमध्ये आहेत. भारताच्या पंजाब आणि राजस्थान सीमेजवळ या रेजिमेंट तैनात आहेत.
प्रत्येक रेजिमेंटमध्ये किती तोपा?
SH-15SP ही चीनने बनवलेली स्टेट-ऑफ-द-आर्ट हॉवित्जर तोप आहे. 2019 मध्ये पाकिस्तानने चीनकडे अशा 236 तोपांची मागणी केली होती. सध्या पाकिस्तानला अशा 42 तोपा मिळाल्या आहेत. पाकिस्तानने आपल्या आर्मी डे परेडमध्ये या तोपांच प्रदर्शन केलं होतं. पाकिस्तानी सैन्य तीन आर्टिलरी रेजिमेंटला अपडेट करत आहे. प्रत्येक रेजिमेंटमध्ये 18 तोपा आहेत.