‘आम्ही मेल्याच नाटक केलं’, जम्मू दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या यात्रेकरुंचा अंगावर काटा आणणारा अनुभव

| Updated on: Jun 10, 2024 | 12:47 PM

Bus Terror Attack : राजौरी आणि रियासी बॉर्डर दरम्यान बसला टार्गेट केलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राजौरीमध्ये दहशतवादी अबू हमजा सक्रीय आहे. अबू हमजाचे फोटो समोर आलेत. त्याला शोधण्यासाठी सुरक्षा पथकांनी शोध अभियान सुरु केलय.

आम्ही मेल्याच नाटक केलं, जम्मू दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या यात्रेकरुंचा अंगावर काटा आणणारा अनुभव
Jammu Bus Terror Attack
Follow us on

जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तान स्थित लश्कर-ए-तयबा ही संघटना यामागे आहे. बस शिवखोरीहून परतत असताना हा दहशतवादी हल्ला झाला. बसमधील सर्व यात्रेकरुन भगवान शंकराच दर्शन घेऊन परतत होते. यात्रेकरु कटराच्या वाटेवर असताना हा हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात 9 यात्रेकरुंचा मृत्यू झाला. 33 जखमी झाले. दहशतवाद्यांनी 30 ते 40 गोळ्या झाडल्या. एक गोळी ड्रायव्हरला लागली. त्यामुळे बस 200 फूट खोल दरीत कोसळली. बसवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी आहेत. त्यांनी राजौरी आणि रियासी बॉर्डर दरम्यान बसला टार्गेट केलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राजौरीमध्ये दहशतवादी अबू हमजा सक्रीय आहे. अबू हमजाचे फोटो समोर आलेत. त्याला शोधण्यासाठी सुरक्षा पथकांनी शोध अभियान सुरु केलय.

ज्या बसवर हल्ला झाला, त्यातील यात्रेकरु उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानचे राहणारे आहेत. सर्व जखमींना नारायण हॉस्पिटल आणि जम्मूच्या गवर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. NIA कडे तपास सोपवण्यात आला आहे. NIA ची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. त्याशिवाय FSL टीम घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहे. या हल्ल्यात जखमी झालेले यात्रेकरु संतोष कुमार वर्मा म्हणाले की, “शिवखोरी येथे दर्शन करुन आम्ही परत येत होतो. अचानक रस्त्याच्यामध्ये एक दहशतवादी आला व गोळीबार सुरु केला. त्याने ड्रायव्हरवर दोन-तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर बसच्या आत फायरिंग केली. बस दरीत कोसळल्यानंतर पण ते बराचवेळ गोळीबार करत होते”

म्हणून आम्ही शिवखोरीला दर्शनासाठी गेलो

त्यानंतर लोकांच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज आला. मध्ये-मध्ये ते थांबून फायरिंग करत होते. हे दहशतवादी दरीत उतरुनही गोळीबार करत होते. यात्रेकरु शांत पडून राहिले. मृत्यू झाल्याच नाटक त्यांना कराव लागलं. अन्य एका जखमीने सांगितलं की, “आम्ही वैष्णो देवीच दर्शन करु आलो होतो. आमच्याकडे वेळ होता. म्हणून आम्ही शिवखोरीला दर्शनासाठी गेलो होतो. दर्शन करुन परतलो. बरोबर अर्ध्या तासाने आमच्या गाडीवर गोळीबार झाला. बसच्या काचा तुटल्या. आमची बस दरीत कोसळली. त्यानंतरही काहीवेळ गोळीबार सुरु होता”