Asaduddin Owaisi | पुन्हा एकदा ओवैसींसमोर त्यांच्या सभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’, त्यांनी काय केलं?

| Updated on: Aug 31, 2023 | 7:50 AM

Asaduddin Owaisi | असुदुद्दीन ओवैसीसमोर हे घडल्यानंतर त्यांनी काय केलं?. ओवैसींसमोर अशी घोषणाबाजी होण्याची ही पहिली वेळ नाहीय. अनेकदा ओवैसी यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्मण झालाय. आता पुन्हा एकदा भरसभेत ओवैसीसमोर हा प्रकार घडला.

Asaduddin Owaisi | पुन्हा एकदा ओवैसींसमोर त्यांच्या सभेत पाकिस्तान जिंदाबाद, त्यांनी काय केलं?
asaduddin owaisi
Image Credit source: twitter
Follow us on

डुमरी : झारखंडच्या डुमरीमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्या ठिकाणी AIMIM ने आपला उमेदवार उभा केला आहे. अब्दुल मोबिन रिजवी यांना AIMIM तिकिट दिलं आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदुद्दीन ओवैसी यांची बुधवारी एक जनसभा झाली. असुदुद्दीन ओवैसी जनसभेला संबोधित करत होते. त्यावेळी जनसभा ऐकायला आलेल्या काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घोषणा ऐकून ओवैसींनी त्यांना टोकलं. त्यांच्यावर ओरडले. ‘तुम्ही शांत बसा व मी जे म्हणतोय ते ऐका’ असं असुदुद्दीन ओवैसी घोषणा देणाऱ्यांना म्हणाले.

ओवैसी यांच्या सभेतील आपत्तीजनक घोषणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घोषणा कोणी दिल्या? त्यांना शोधून कारवाई करण्यासाठी डुमरी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. ओवैसी यांच्या सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जाणं, हे अत्यंत दुर्देवी आणि लज्जास्पद असल्याच भाजपाने म्हटलं आहे. “सभेत आपत्तीजनक घोषणा देऊन सात तास उलटले, मात्र तरीही अजून जिल्हा प्रशासनाने कुठलीही प्राथमिक तक्रार दाखल केलेली नाही. त्यांना अटक झालेली नाही. हे खेदजनक आहे” असं झारखंड भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शाहदेव यांनी म्हटलं आहे.

भाजपाने काय म्हटलय?

“झारखंड सरकारने आरोपींवर कठोर कारवाई करावी. अशा लोकांना शोधून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे” असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शाहदेव यांनी म्हटलं आहे. गिरिडीह एसपी दीपक शर्मा आणि डुमरी एसडीएम शहजाद व्हायरल व्हिडिओचा तपास करत आहेत. अज्ञात आरोपींविरोधात देशविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात येईल, असं म्हटलं जातय.

ओवैसीसमोर हे पहिल्यांदा घडलय का?

याआधी मागच्यावर्षी 2022 मध्ये मांडर पोटनिवडणुकीच्यावेळी AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी रांची एयरपोर्टवर आले होते. त्यावेळी विमानतळावर उपस्थित त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. ओवैसी झारखंडमध्ये आल्यानंतर अशा प्रकारची घोषणाबाजी होत आहे. त्यामुळे AIMIM च निवडणुकीत नुकसान होऊ शकतं. ओवैसींनी सुद्धा यावर नाराजी व्यक्त केली आहे.