सीमा ओलांडून पाकिस्तानी भारतात आला, बीएसएफच्या जवानांनी पकडला, घातपात की आणखी काही?

| Updated on: Feb 17, 2024 | 5:44 PM

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुदासपूर जिल्ह्यातील ठाकूरपूर येथे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले. मुहम्मद अब्दुल्ला असे या व्यक्तीचे नाव आहे. बीएसएफने त्या पाकिस्तानी नागरिकाला पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सीमा ओलांडून पाकिस्तानी भारतात आला, बीएसएफच्या जवानांनी पकडला, घातपात की आणखी काही?
INDIA PAKISTHAN BORDER
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 17 फेब्रुवारी 2024 : मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरात बॉम्बस्फोट घडविण्याच्या आलेल्या धमकीमुळे राज्यात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशाच्या सीमेवरून एक मोठी बातमी आली आहे. भारत पाकिस्तान सीमा ओलांडणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफच्या जवानांनी पकडले आहे. बीएसएफने अटक केलेल्या व्यक्तीला पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या पंजाब पोलीस त्या व्यक्तीची चौकशी करत आहेत.

मुंबई येथील डोंगरी विभागातील बाबा मस्जिदमध्ये काही दहशतवादी घुसल्याचा कॉल मुंबई पोलिसांना आला होता. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नाही. कॉल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. भगवान रामचंद्र भापकर असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने पीसीओ बुथवरून हा कॉल केला होता.

मुंबईतील या घटनेनंतर पुणे पोलिसांनाही शिवाजी नगर आणि पुणे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा कॉल आला. पुणे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला असता एका माथेफिरूने हा कॉल केल्याचे समोर आले. या दोन्ही घटनांमुळे पोलीस सतर्क झाले आहेत. अशातच पाकिस्तानी नागरिकाला पकडण्यात आल्यामुळे पोलीस अधिक सावध झाले आहेत.

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुदासपूर जिल्ह्यातील ठाकूरपूर येथे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले. मुहम्मद अब्दुल्ला असे या व्यक्तीचे नाव आहे. बीएसएफने त्या पाकिस्तानी नागरिकाला पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मुहम्मद अब्दुल्ला पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्यातील कोट नैना येथील रहिवासी आहे. सीमा ओलांडत असताना त्याला बीएसएफ जवानांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याच्याकडे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्याच्याकडून काही पाकिस्तानी चलन आणि ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला दोरंगळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा पाकिस्तानी नागरिक अजाणतेपणे भारतीय हद्दीत घुसला होता. त्याच्याकडून काहीही आक्षेपार्ह आढळले नाही अशी माहिती दोरंगळा पोलिसांनी दिली.