नवी दिल्ली: प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी (Anindo Chatterjee) यांनी त्यांना मिळालेला पद्मश्री (Padma Shri) पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. संगीत विश्वातून पुरस्कार मिळूनही पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी 2002 मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. जाहीर झालेल्या पद्मश्रीची माहिती देताना पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले, “मला मंगळवारी (25 जानेवारी) दिल्लीतून पुरस्कार स्वीकारण्याबाबत संमतीसाठी फोन आला. मात्र, मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी धन्यवाद म्हटलं, मात्र करियरच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्वीकारण्यास तयार नसल्याचं कळवलं. हा पुरस्कार स्वीकारण्याचा टप्पा मी पार केला आहे.”, असं पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्यावतीनं (Union Government) 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
पंडित अनिंदो चॅटर्जी जाहीर झालेल्या पद्मश्रीची माहिती देताना म्हणाले की, “मला मंगळवारी (25 जानेवारी) दिल्लीतून पुरस्कार स्वीकारण्याबाबत संमतीसाठी फोन आला. मात्र, मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी धन्यवाद म्हटलं, मात्र करिअरच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्वीकारण्यास तयार नसल्याचं कळवलं. हा पुरस्कार स्वीकारण्याचा टप्पा मी पार केला आहे.”, असं पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले.
पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी राष्ट्रपती भवनमध्ये देखील तबलावादन केलंय. 1989 मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये सादरीकरण करण्याचा मान मिळालेले ते सर्वात तरूण तबलावादक होते. पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे.
पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी दहा वर्षांपूर्वी पुरस्कार मिळाला असता तो स्वीकारला अशता. माझ्या पेक्षा ज्युनिअऱ असणाऱ्यांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. मी माफी मागतो पण सध्या पुरस्कार स्वीकारु शकत नाही, असं चॅटर्जी यांनी म्हटलं आहे.
प्रख्यात गायिका संध्या मुखर्जी यांनी देखील त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. संध्या मुखर्जी यांचं वय 90 असून त्यांनी जवळपास 8 दशकं श्रोत्यांची सेवा केली आहे. त्यांना पद्म पुरस्कारापेक्षा आणखी मिळायला हवं, असं मुखर्जी यांच्या कन्येनं म्हटलं आहे.
अनिंदो चॅटर्जी, संध्या मुखर्जी आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धादेव भट्टाचार्य अशा तिघांनी यंदा जाहीर झालेले पद्म पुरस्कार नाकारले आहेत.
इतर बातम्या:
‘आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं’; आमदार विजय रहांगडाले यांची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट
Pandit Anindo Chatterjee refuse to accept Padma Shri Award given by Union Government