Parliament Special Session | जुन्या संसदेत फोटो सेशन सुरु असताना एक खासदार बेशुद्ध

| Updated on: Sep 19, 2023 | 11:09 AM

Parliament Special Session | नव्या संसद भवनात प्रवेशासाठी सर्व खासदारांना ओळखपत्र देण्यात आलं आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नव्या संसद भवनात प्रवेश करण्यात येत आहे.

Parliament Special Session | जुन्या संसदेत फोटो सेशन सुरु असताना एक खासदार बेशुद्ध
Parliament Special Session
Follow us on

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी संसदेच कामकाज मंगळवार दुपारपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. आजपासून नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार आहे. लोकसभेत दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी आणि राज्यसभेत 2 वाजून 15 मिनिटांनी कामकाजाला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व खासदार पायी चालत नव्या संसद भवनात जातील. पीएम मोदींसह अनेक नेत्यांची यावेळी भाषणं होतील. हे संसदेच छोट सत्र आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. म्हणून या सत्राला ऐतिहासिक बनवण्याचा प्रयत्न असेल. सध्या जुन्या संसद भवनात फोटो सेशन सुरु आहे. आज सकाळी 9.30 वाजता सर्व खासदार जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलसमोर फोटो सेशनसाठी जमले होते. पहिल्या फोटोत सर्व लोकसभा खासदार असतील.

दुसऱ्या फोटोमध्ये राज्यसभा खासदार असतील आणि तिसऱ्या फोटोत लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनाचे खासदार असतील. दरम्यान खासदारांच ग्रुप फोटो सेशन सुरु असताना भाजपा खासदार नरहरि अमीन बेशुद्ध झाले. आता ते ठीक आहेत. नव्या संसद भवनात शिफ्ट झाल्यानंतर तिथे लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी बोलतील. सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा स्पीकर ओम बिरला, उपराष्ट्रपति जगदीप धनखड़, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते अधीर रंजन, कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार मेनका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि झारखंड मुक्ति मोर्चा अध्यक्ष शिबू सोरेन बोलतील.


783 खासदार मोदींसोबत असतील

नव्या संसद भवनात प्रवेशासाठी सर्व खासदारांना ओळखपत्र देण्यात आलं आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नव्या संसद भवनात प्रवेश करण्यात येत आहे. 783 खासदार यावेळी पंतप्रधान मोदींसोबत असतील. या खास प्रसंगी पंतप्रधान मोदींसोबत संविधान पुस्तक असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडलं जाऊ शकतं. सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. महिला आरक्षण विधेयक 7 व्यां सादर होणार आहे. 1996 साली देवेगौडा सरकारने पहिल्यांदा हे विधेयक सादर केलं होतं.