नवी दिल्ली : “आजपासून नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वपक्षीय खासदारांनी नवीन संसद इमारतीमध्ये प्रवेश केला. सेंगोल स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे. पंडित नेहरुंच्या हातात हा सेंगोल शोभून दिसत होता. आज आमच्यासमोर आहे. नवीन संसद आधुनिक भारताच्या भव्यतेच प्रतीक आहे. जुन्या गोष्टी आपण विसरल्या पाहिजेत. भवन बदललय, भावना सुद्धा बदलल्या पाहिजेत. संसद पक्ष हितासाठी नाही, देश हितासाठी आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “गणेशजी शुभ आणि सिद्दीचे देवता आहेत. आज गणेश चतुर्थीच्या पावनदिवशी पुढे जात आहोत. देशवासियांना शुभेच्छा” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “भूतकाळातील कडवटपणा विसरुन पुढे जाऊया. आज क्षमा मागण्याचा दिवस आहे. कोणाच मन दुखावलं असेल, तर विनम्रतापूर्वक सर्व खासदारांच आणि देशवासियांची माफी मागतो. समृद्ध भारताच्या प्रेरणेने पुढे जायच आहे. नव्या संकल्पासह नवीन भवनात आलो आहोत” असं मोदी म्हणाले.
महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “सरकारने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या पवित्र कामासाठी देवाने माझी निवड केली आहे. आज संविधान संशोधन विधेयक सादर होत आहे” महिला आरक्षण विधेयकाचा नाव नारी शक्ति वंदन अधिनियम ठेवण्यात आलय. “पुरेसे आकडे नसल्याने महिला आरक्षण विधेयक पूर्णत्वाला जाऊ शकलं नव्हतं. यासाठी सुद्धा आधी प्रयत्न झाले आहेत. आजची तारीख अमर होईल. सर्व सदस्यांना आग्रह करतो की, पावन सुरुवात होत आहे. सर्वसहमतीने जेव्हा या विधेयकाचा कायद्यात रुपांतर होईल, तेव्हा ताकत अधिकपटीने वाढलेली असेल” “संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक पास व्हाव अशी प्रार्थना करतो” असं मोदी म्हणाले.
30 हजार कामगारांनी उभारलं भवन
“आज आपण नवीन सुरुवात करतोय. 30 हजार कामगारांनी मेहनत घेऊन हे संसद भवन उभारलय” असं नरेंद्र मोदी म्हणाले. “संसदेतील सर्व खासदारांचा व्यवहार योग्य असायला पाहिजे. खासदारांच्या व्यवहारावरुन कळेल कोण संसदेत बसणार आणि कोण विरोधात” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.