Parliament Monsoon Session: फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी करा, शिवसेना करणार लोकसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी

| Updated on: Jul 20, 2021 | 11:50 AM

पेगासस स्पायवेअरद्वारे झालेल्या फोन टॅपिंगवरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवेसेनेने केली आहे. (vinayak raut)

Parliament Monsoon Session: फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसीकडून चौकशी करा, शिवसेना करणार लोकसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता
Follow us on

नवी दिल्ली: पेगासस स्पायवेअरद्वारे झालेल्या फोन टॅपिंगवरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवेसेनेने केली आहे. यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे लेखी मागणी करणार असल्याचंही शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. (Pegasus row: shiv sena demands probe into ‘phone tapping’ by jpc)

शिवसेनेचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली. आम्ही फोन टॅपिंग प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशीची लेखी मागणी लोकसभा अध्यक्षांना करणार आहोत. काल संबंधित मंत्र्यांनी खुलासा केला असला तरी तो योग्य नव्हता, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. तसेच आज लोकसभेत इंधन दरवाढ आणि वाढती महागाई यावर प्राधान्याने चर्चा व्हावी ही मागणी शिवसेनेनं केली आहे. कोरोनावरील चर्चेला पंतप्रधानांनी सभागृहला उत्तर द्यावे ही अपेक्षा शिवसेनेची आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

कोरोनातील भ्रष्टाचार दाखवून देऊ

आज सायंकाळी पंतप्रधान कोव्हिडबाबत सर्व पक्षांना एक सादरीकरण देणार आहेत. कोरोनाबाबत सभागृहात विस्तृत चर्चा व्हायला हवी. त्यापूर्वी पंतप्रधान विस्तृत प्रेझेन्टेशन करत असेल तर त्याला शिवसेना उपस्थित राहील. तिथे आम्ही दाखवून देऊ की कोरोना उपाय योजनांमध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे. पीएम केअर फंडाचा किती करोडो रुपयांचा दुरूपयोग केला गेला ते दाखवून देऊ. या गोष्टी आम्हाला पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

सिंधुदुर्ग विमानतळासाठी सिंधियांची भेट

नवे नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची मी काल भेट घेतली. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू करण्याबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली. विमानतळ विमान उड्डाणाला सज्ज झाले आहे. DGCA रिपोर्टची वाट पाहत आहोत. हा परवाना मिळवण्यासाठी 28 जूनला आयआरबीने अर्ज केला आहे. कोरोनामुळे डीजीसीए टीम सिंधुदुर्गात जाऊ शकलेली नाही. पण ती लवकरात लवकर जावी आणि लवकर परवाना मिळावा अशी आमची मागणी आहे. मंत्र्यांनी मला 8 ते 10 दिवसांत रिझल्ट देतो असा शब्द मला दिला आहे. येत्या 8 – 10 दिवसात टीम सिंधुदुर्गात गेली आणि लगेच परवाना मिळाला तर गणेश चतुर्थीपूर्वी विमान उडायला काही हरकत नाही, असं ते म्हणाले.

आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार

मुंबई विमानतळाच्या मुख्यालयाच्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचं महत्व वाढावा. आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जातेय. शिवसेना हे सहन करणार नाही. मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील यासाठी शिवसेना आक्रमक राहील, असा इशाराही त्यांनी दिला. (Pegasus row: shiv sena demands probe into ‘phone tapping’ by jpc)

 

संबंधित बातम्या:

देशात कोणीही सुरक्षित नाही, संजय राऊतांचा पेगासस प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला

दोन केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंग हे धक्कादायक, मोदी, शहांनीच खुलासा करावा; राऊतांची मागणी

Parliament Monsoon Session: राहुल गांधींच्या हेरगिरीच्या वृत्ताने काँग्रेस भडकली; केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हकालपट्टीची केली मागणी

(Pegasus row: shiv sena demands probe into ‘phone tapping’ by jpc)