अलीगढ | 23 डिसेंबर 2023 : अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी नुमैर खान आपल्या आई आणि लहान भावासोबत कारने शाहजहांपूर येथे जात होते. सकाळचे सात वाजले होते. फतेहगंज पूर्व ते दातागंज या राज्य महामार्गावर ते आले. मारुझाला येथील मढी गावाजवळ ते आले असता त्यांना एक अरुंद रस्ता लागला. सकळाचे धुके असल्याने त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. काही लोक बाहेरून त्यांना थांबा असा इशारा करत होते. मात्र, ते गाडी चालवत राहिले. काही वेळ झाला आणि त्यांच्या गाडीला एक जोरदार धक्का बसला. त्यांनी गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण…
फतेहगंज पूर्व ते दातागंज या राज्य महामार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. राज्य महामार्गाचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी एका नदीवर कल्व्हर्ट बांधण्याचे काम सुरु होते. नुमैर खान याच रस्त्यावरून जात होते. सकाळचे धुके असल्याने त्यांना समोरचे अंधुक दिसत होते. अंदाजाने ते गाडी चालवत होते.
मारुझाला येथील मढी गावाजवळ नुमैर खान यांची गाडी आली. येथे काही कामगार त्यांना हाताने थांबा असा इशारा करत होते. मात्र, तोपर्यंत त्यांची गाडी कल्व्हर्टचे काम सुरू होते तिथपर्यंत आली. रस्त्याच्या मधोमध बांधलेल्या त्या कल्व्हर्टच्या आजूबाजूला चिन्हे आणि काहिच अडथळे नव्हते. त्यामुळे त्यांची गाडी बांधकाम सुरु असलेल्या कल्व्हर्टच्या खांबावर चढली.
मढी गावाजवळ झालेल्या या विचित्र अपघातात नुमैर खान यांनी गाडीबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र. कल्व्हर्टवर कार लटकल्याने त्यांना गाडीबाहेर पडणे अशक्य झाले. नुमैर खान आणि त्यांच्यासोबत असलेले भाऊ आणि आई या अपघातात जखमी झाले. या अपघातात नुमैर खान यांचा हात आणि त्यांच्या आईचे पाठीचे हाड मोडले. तर भावाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
नुमैर खान यांनी कल्व्हर्टचे बांधकाम सुरु होते. मात्र तिथे कोणतेही इंडिकेटर लावण्यात आले नाही. अडथळे नव्हते. बांधकाम करणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असा आरोप केला. तसेच त्यांनी बांधकाम करणाऱ्या शकुंतला फर्मचे मालक रमेश सिंग यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
नुमैर खान यांची गाडी कल्व्हर्टवर चढली त्यावेळी शकुंतला फर्मचे मालक रमेश सिंग आणि चार पाच कामगार हातात कुदळ आणि फावडे घेऊन आले. आम्हाला बाहेर काढण्याऐवजी त्यांनी शिवीगाळ करून गाडी बघून चालवता येत नाही का? अशी दमदाटी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, पीडब्ल्यूडीचे अधिकारी सिन्हा यांनी राज्य महामार्गाचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्यावर कल्व्हर्टचे बांधकाम करण्यात येत होते. कल्व्हर्ट सुरु होण्याआधी एक वळण देण्यात आले आहे. त्याचा बोर्डही लावण्यात आला आहे. मातीचा ढीग ठेवण्यात आला आहे. पण, धुक्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे असे स्पष्ट केले.