नवी दिल्ली: सोमवारी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2020 च्या पद्म पुरस्कारांनी 119 जणांना सन्मानित करण्यात आलं. कर्नाटकातील पर्यावरणतज्ज्ञ तुलसी गौडा यांनी पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी तुलसी गौडा यांचा फोटो शेअर केला आहे.
पद्म पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यामध्ये ज्यावेळी तुलसी गौडा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचं हात जोडून स्वागत केलं. नरेंद्र मोदी यांनी हा फोटो इन्स्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्या फोटोला “इमेज ऑफ द डे” हे कॅप्शन दिलं आहे.
Picture of the Day. Symbolises Padma Awards becoming truly a people’s award @narendramodi pic.twitter.com/wCMHK7jY4b
— Aman Sharma (@AmanKayamHai_) November 8, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलसी गौड यांच्याशी हस्तांदोलन केल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भेटीदरम्यान तुलसी गौडा आणि नरेंद्र मोदी यांच्या संवाद झाला.
Tulsi Gowda an Indian environmentalist aged 72, Tribal legend from Honnali village, Karnataka. She has planted more than 30,000 saplings & looks after it, she made immense contributions towards preserving the environment. She is honoured with #PadmaShri She is Indian’s pride now. pic.twitter.com/CvMZmWJobG
— Mohan G Kshatriyan (@mohandreamer) November 9, 2021
कर्नाटक राज्यातील होन्नाळी गावामध्ये तुलसी गौडा वास्तव्यास आहेत. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी त्या गेल्या 60 वर्षांपासून काम करत आहेत. तुलसी गौडा यांनी आतापर्यंत 30 हजार झाडं लावली आहेत. तुलसी गौडा या वनविभागाची नर्सरी देखील सांभाळताता.
तुलसी गौडा यांचं वय 77 वर्ष असून त्या हलक्की या आदिवासी जमातीचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांची इनसायक्लोपिडीया ऑफ फॉरेस्ट अशी ओळख आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तुलसी गौडा यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षणाच्या कामासाठी तुलसी गौडा यांचा गौरव करण्यात येत असल्याचं राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं गेलंय.
इतर बातम्या:
CBSE Admit Card 2021: सीबीएसई दहावी बारावीच्या टर्म 1 परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर करण्याची शक्यता
ST Strike: नाशिक जिल्ह्यात 2100 बस फेऱ्या रद्द; खासगी प्रवासभाडे झाले चौपट, चाकरमानी कोंडीत
Photo of the day Karnataka environmentalist Padmashri award winner tulsi gowda greet PM Narendra Modi viral on Social Media