Lakshadweep Tourism | भारताच्या लक्षद्वीपची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अद्भुत आणि सुंदर बेटाचा दौरा केला. त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर अनेकांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याच कौतुक केलं. सुट्टयांमध्ये मालदीवपेक्षाही ही चांगली जागा असल्याच म्हटलं. मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आणि एकच वाद सुरु झाला. सोशल मीडियावर अनेकांनी लक्षद्वीपच्या सौंदर्याच कौतुक करत मालदीवच बुकिंग रद्द केलं. लक्षद्वीप फिरण्याचे प्लान बनवले. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीय का? लक्षद्वीपमध्ये एकच एअरपोर्ट आहे, तो सुद्धा इतका खतरनाक आहे की, अनेकदा पायलटच लँडिंगच्यावेळी टेन्शमध्ये येतात.
लक्षद्वीपचा हा एकमेव एअरपोर्ट अगाती बेटावर आहे. हा अगाती एअरपोर्ट म्हणून ओळखला जातो. हा एअरपोर्ट 1204 मीटर लांब असून 30 मीटर रुंद आहे. चारही बाजूला समुद्राचे पाणी आहे. त्यामुळेच अनेकदा प्लेन उतरवण्यात आणि टेकऑफ करताना वैमानिकांची हालत खराब होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एअरपोर्टवर प्लेन लँड होताना दिसतय. लँडिंगचा अनुभव खतरनाक असला, तरी आकाशातून एअरपोर्टच दृश्य किती सुंदर आहे? ते या व्हिडिओमध्ये दिसतं.
किती लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला?
प्लेन लँडिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टि्वटरवर @RaushanRRajput नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आलाय. अवघ्या 27 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 75 लाखापेक्षा पण अधिकवेळा पाहण्यात आलाय. 98 हजारपेक्षा अधिक लोकांनी व्हिडिओ लाइक केलाय.
1st flight ✈️ landing 🛬 on lakshadweep agatti Island 🏝️🏝️🏝️https://t.co/iicDYHj5K3 pic.twitter.com/mbENncAhZy
— Raushan Raj Rajput (@RaushanRRajput) January 8, 2024
‘ही जागा एक स्वर्ग आहे’
व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका पाकिस्तानी युजर्सनी लिहिलय की, “ही जागा एक स्वर्ग आहे. भारतीय प्रशासन प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतय” दुसऱ्या एका युजरने लिहिलय की, “लवकरात लवकर याला जागतिक विमानतळामध्ये बदलण्याची गरज आहे”