पीएम किसान सन्मान निधी दुप्पट होणार? बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा

| Updated on: Jan 11, 2024 | 2:32 PM

पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे.या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम सध्या सहा हजार रुपये आहे. जी 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात दुप्पट करण्याची घोषणा केली जाऊ शकते. कोणाला मिळणार हा लाभ जाणून घ्या.

पीएम किसान सन्मान निधी दुप्पट होणार? बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा
Follow us on

Budget 2024 : बजेटमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी सरकार मोठी घोषणा करु शकते. लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. अशा परिस्थितीत यावर्षी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार निवडणुकीआधी सरकार महिला शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी दुप्पट करू शकते. आता लाभार्थ्यांना पीएम किसान निधी म्हणून वर्षाला एकूण 6,000 रुपये तीन टप्प्यात दिले जाता.

सरकार PM सन्मान निधीची रक्कम वाढवू शकते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार महिला शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या तयारीत आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतात. जी आताच्या तुलनेत दुप्पट आहे. 1 फेब्रुवारीला सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यानंतर निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या आधी महिलांसाठी ही मोठी घोषणा होऊ शकते. यामुळे सरकारव दरवर्षी 120 अब्ज रुपयांचा बोजा पडू शकतो.

आरोग्य आणि जीवन विमा यासारख्या सुविधा

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे ही म्हटले आहे की, सरकार पीएम किसान सन्मान निधीमध्ये दोन हजारांची वाढ शकते. म्हणजेच शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून वर्षाला एकूण 8000 रुपये मिळतील. याशिवाय शेतकऱ्यांना आरोग्य आणि आयुर्विमा यासारख्या सुविधाही मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा

अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी सरकार काही मोठ्या घोषणा करु शकते. या अंतरिम अर्थसंकल्पात, पीएम स्वानिधी अंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांचाही समावेश करायचा आहे आणि सरकार विविध व्यावसायिकांसाठी विश्वकर्मा योजनाही आणणार आहे, ज्याद्वारे महिलांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल. काही दिवसांपूर्वीच लखपती दीदी योजनेंतर्गत महिलांना शेतीसाठी ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.