नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर २०२३ : LPG गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा 100 रुपयांनी कपात केली आहे. केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात उज्ज्वला लाभार्थ्यांना दिलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारच्या या निर्णयावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरची किंमत पुन्हा शंभर रुपयांनी कमी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे देशातील करोडो माता-भगिनींच्या नवरात्री आणि इतर सणांची चमक वाढली आहे.
200 रुपये प्रति सिलिंडरची सबसिडी, राखीवर 200 रुपयांची सूट आणि कालच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयात 100 रुपयांची सूट दिल्यानंतर आता उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी एकूण एलपीजी 500 रुपयांनी स्वस्त झाला आहे. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की 2014 मध्ये ज्या किमतीत गॅस सिलिंडर उपलब्ध होते, त्याच किमतीत आज 2023 मध्ये उज्ज्वला माता-भगिनींना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील. ते म्हणाले की, हा निर्णय गरीब, माता, भगिनी, मुली आणि वंचित घटकांचे हित, स्वाभिमान आणि सन्मान जपण्यासाठी मोदी सरकारची संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवितो.
उज्ज्वला लाभार्थियों के लिए गैस सिलिंडर के दाम में फिर 100₹ कटौती कर के प्रधानमंत्री @narendramodi जी ने करोड़ों माताओं-बहनों के लिए नवरात्रि और अन्य त्योहारों की रौनक़ बढ़ाई है।
प्रति सिलिंडर 200₹ की सब्सिडी, राखी पर 200₹ की कटौती की सौग़ात और कल कैबिनेट के निर्णय में 100₹… pic.twitter.com/owXC0sA0Nk
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) October 5, 2023
4 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला.