राज्यात कोरोनानंतर राजकारणाने अनेक वळणं घेतली आहे. प्रत्येक वळणावर भाजपने धक्कातंत्राचा यशस्वी प्रयोग केला. महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आणला आहे. शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. हे दोन्ही गट भाजपासोबत आली आणि त्यांनी महायुतीचे सरकार राज्यात आणले.महाराष्ट्रात विरोधी पक्षाबाबत संभ्रम आहे. शिवसेना फुटली आहे, राष्ट्रवादी फुटली आहे, काँग्रेसचे काही नेते इकडे तिकडे गेले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे भावनिक मुद्दा आहे. भाजपसमोर महाराष्ट्रात भावनिक मुद्दा मोठं आव्हान आहे असं वाटतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या महामुलाखतीत या प्रश्नावर खास उत्तर दिले.
महाराष्ट्र आमच्याशी भावनिकरित्या जोडलेला
मलाही वाटतंय यावेळी ही इमोशनल परिस्थिती भाजपच्या बाजूने आहे. युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत आहे. अधिकृत राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. त्यामुळे लोकांना वाटतंय की कुटुंबाच्या सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं. कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला इस्टॅब्लिश करण्यासाठी? बाळासाहेबांचा एवढा मोठा वारसा. बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी जीवन अर्पण केलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांच्या सन्मानासाठी जी शिवसेना काम करत आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, ती आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार आमच्यासोबत भावनने जोडलेला गेला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे तर त्यांच्या कुटुंबातील भांडण
शरद राव यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी महाराष्ट्रातील जनतेला कसं पटेल? असा सवाल मोदींनी केला. हा त्यांचा कौटुंबीक प्रॉब्लेम आहे. घरातील झगडा आहे. वारसा काम करणाऱ्या मुलाला द्यायचा की मुलगी आहे तर मुलीला द्यायचा. झगडा त्याचा आहे. सहानुभूतीऐवजी संतापाचं वातावरण आहे, की या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला काय सांभाळतील. सर्व इमोशन आमच्या बाजूने आहे, अशी त्यांनी पुन्हा सांगितले.
ठाकरेमध्ये सत्तेची लालसा
ज्या कालखंडात ज्यांनी सरकार चालवलं. सर्व कामे बाळासाहेबांच्या विचारधारेच्या विरोधात होते. औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा बसतो याचा प्रचंड राग महाराष्ट्राच्या मनात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बसल्यावर लोकांना राग येतो. लोक म्हणतात, बाळासाहेबांनी तर आम्हाला हे सांगितलं होतं. त्याच्या मुलांमध्ये सत्तेची लालसा अशी आली. त्यामुळे इमोशन्स आमच्याबाजूने आहेत. तर राग त्यांच्या विरोधात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.