नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चॅनल्स फीचरच्या माध्यमातून Whats App वर सहभागी झाले आहेत. 11 दिवसांत 50 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. दरम्यान, सोमवारी त्यांनी फॉलो करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. या चॅनलद्वारे आपण विविध मुद्द्यांवर जोडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या Whats App चॅनलवर एक पोस्ट शेअर करताना पीएम मोदींनी लिहिले की, ‘आम्ही ५३ लाखांहून अधिक जणांचा समुदाय बनलो आहोत, माझ्या व्हॉट्सअॅप चॅनलद्वारे माझ्याशी जोडलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. तुमच्या प्रत्येकाच्या सतत समर्थन आणि प्रतिबद्धतेबद्दल कृतज्ञ. आम्ही संभाषण सुरू ठेवू आणि या माध्यमातून विविध विषयांवर कनेक्ट राहू.
Whats App चॅनलवर पंतप्रधान मोदींची पहिली पोस्ट केली होती. संसदेच्या नवीन इमारतीतील काही फोटो त्यांनी शेअर केले होते. ते म्हणाले की, Whats App कम्युनिटीमध्ये सामील होताना मला खूप आनंद होत आहे. संवाद प्रवासातील हे आणखी एक पाऊल आहे. पंतप्रधान मोदींनी लोकांना येथे येऊन सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
WhatsApp चे चॅनेल वैशिष्ट्य सर्व iOS डिव्हाइसवर उपलब्ध आहे, परंतु हे वैशिष्ट्य अद्याप सर्व Android डिव्हाइसवर नाही. काही सॅमसंग फोनमध्ये चॅनेल वैशिष्ट्य आहे, परंतु इतरांना अद्याप ते मिळालेले नाही. जर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चॅनेल फीचर नसेल, तर तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store द्वारे तुमचे WhatsApp अपडेट करू शकता. याच्या मदतीने चॅनेलचे फीचर दिसू शकते.
Whats App चॅनेल हे एकतर्फी प्रसारण साधन आहे. या चॅनेलद्वारे, युजर विशिष्ट गटाशी कनेक्ट राहू शकतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत सहज पोहोचता येते आणि माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ, अक्षय कुमार, विजय देवरकोंडा, नेहा कक्कर आणि अगदी फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यासारख्या इतर प्रमुख सेलिब्रिटींनी स्वतःचे Whats App चॅनेल सुरू केले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे स्वतःचे Whats App चॅनेल देखील आहे.