G20 च्या मंचावरुन PM मोदी यांनी लॉन्च केले ग्लोबल बायोफ्यूल अलायंस? जाणून घ्या काय आहे ते?

| Updated on: Sep 09, 2023 | 11:16 PM

G20 परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांच्या उपस्थितीत ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स लाँच केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी जगातील इतर देशांना यात सहभागी होण्यासाठी आणि या दिशेने परस्पर सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले आहे.

G20 च्या मंचावरुन PM मोदी यांनी लॉन्च केले ग्लोबल बायोफ्यूल अलायंस? जाणून घ्या काय आहे ते?
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या G20 परिषदेत भारताच्या यशाचा झेंडा फडकवण्यात आला आहे. यादरम्यान पीएम मोदींनी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स लाँच केले. G20 परिषदेदरम्यान जागतिक जैवइंधन अलायन्सचा शुभारंभ करताना, PM मोदींनी जगातील इतर देशांना त्यात सामील होण्यासाठी आणि या दिशेने परस्पर सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्व देशांनी इंधनावर एकत्र काम केले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पीएम मोदींच्या हस्ते लॉन्चिंगनंतर आता याची चर्चा होत आहे.

ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स लाँच केल्यानंतर जैवइंधन म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे.सोप्या भाषेत समजल्यास जैवइंधन म्हणजे झाडे, वनस्पती, धान्य किंवा अन्नाच्या कचऱ्यापासून तयार होणारे इंधन. यामध्ये प्रामुख्याने इथेनॉल, बायोडिझेल आणि बायोगॅस यांचा समावेश आहे.

आज जैवइंधन अलायन्सचा प्रस्ताव मांडताना पीएम मोदींनी जैवइंधनाचा वापर वाढवण्याबाबत आणि पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याबाबत सांगितले, ज्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली.

जैवइंधनाबाबत भागीदारी वाढेल

तसेच, पंतप्रधान मोदींनी जगातील इतर देशांना ग्लोबल बायोफ्युएल अलायन्समध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले. विविध देशांच्या सहभागासह, ही एक जागतिक युती असेल, ज्यामध्ये सर्व देश एकत्रितपणे जैवइंधनाबाबत परस्पर भागीदारी वाढवतील.

जगातील सर्व देशांनी इंधनावर एकत्र काम केले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण 20 टक्क्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रस्ताव आहे आणि त्यासाठी जागतिक स्तरावर पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

जैवइंधनाचा वापर वाढवणे आणि जागतिक बाजारपेठ मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. देशांमधील जैवइंधनाचा परस्पर व्यापार सुलभ करणे आणि जैवइंधन उत्पादनाबाबत एकमेकांना तांत्रिक सहाय्य प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे.

जैवइंधन उत्पादनाच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझील हे जागतिक आघाडीवर मानले जातात. हे दोन्ही देश G-20 चा भाग आहेत, त्यामुळे ही आघाडी या दिशेने मैलाचा दगड ठरू शकते.

जैवइंधन हे भारताच्या भविष्याचे इंधन असेल

अमेरिका दरवर्षी 57.5 अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन करते आणि ब्राझील 35.6 अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन करते. भारत या दिशेने वेगाने प्रयत्न करत आहे आणि गेल्या वर्षी भारताने 3 अब्ज लिटर उत्पादन केले.

अलीकडेच संपूर्णपणे इथेनॉलवर चालणारी एक प्रोटोटाइप कार देशात लाँच करण्यात आली आहे. यावरून हे स्पष्ट होते की भारताने जैवइंधन हे भविष्यातील इंधन मानले आहे आणि या दिशेने वेगाने वाटचाल करायची आहे.

जैवइंधनाच्या वापरामुळे नैसर्गिक इंधनावरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे प्रदूषण रोखण्यासही मदत होईल, कारण जैवइंधनामध्ये नैसर्गिक इंधनापेक्षा कमी कार्बनचे प्रमाण असते.

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधीही या सत्रात सहभागी झाले होते.