PM Modi And Meloni Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 परिषेदसाठी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतचा एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये दोन्ही नेते हसत हसत कॅमेऱ्याकडे हात हलवताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक यूजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर तो व्हिडिओ रिपोस्ट करत लिहिले आहे की, ‘भारत-इटली मैत्रीपूर्ण संबंध नेहमी कायम राहणार आहे.’ नरेंद्र मोदी यांनी या मेसेजसोबत दोन्ही देशांचा झेंडाही लावला आहे.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिला विदेश दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतला. जगभरातून आलेल्या मोठ्या नेत्यांच्या भेटी झाल्या. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर भारताची छाप दिसून आली. त्यांनी परिषदेत आलेल्या जगभरातील सर्व नेत्यांचे स्वागत नमस्ते…करत केले.
Long live India-Italy friendship! 🇮🇳 🇮🇹 https://t.co/vtOv8lfO51
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीतील लोकांचे आणि तेथील सरकारचे उत्कृष्ट आदरातिथ्य केल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, महत्त्वाच्या G7 परिषदेत मी सहभागी झालो. त्या ठिकाणी मी जागतिक नेत्यांसमोर भारताचा दृष्टीकोन मांडला. या पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या प्रवासाची झलक पाहायला मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इटली दौरा चांगला चर्चेत राहिला आहे. नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी राजकारणात शुन्यातून सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही नेते देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत. हे दोन्ही नेते आपल्या देशात प्रचंड लोकप्रिय आहेत. G-7 शिखर परिषदेत भारताला यंपाहुणे देश म्हणून आमंत्रित केले आहे. कारण भारत G-7 चा सदस्य नाही. G-7 मध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि युरोपियन युनियन आहे.