अभिनंदन करताना पाकिस्तानचा डिवचण्याचा प्रयत्न, मोदींनी दिलं सडेतोड उत्तर

| Updated on: Jun 10, 2024 | 8:17 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. त्यांच्यानंतर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देखील मोदींचे अभिनंदन केले. पण शरीफ यांनी मोदींना डिवचण्याचा प्रयत्न केला असतान मोदींनी देखील त्यांना उत्तर दिले.

अभिनंदन करताना पाकिस्तानचा डिवचण्याचा प्रयत्न, मोदींनी दिलं सडेतोड उत्तर
Follow us on

नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे. देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. ज्यामध्ये श्रीलंका, भुटान, नेपाळ, मालदीव या सारख्या देशांचा समावेश आहे. पंतप्रधान झाल्यानंतर अनेक देशांमधून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांनी त्यांचं अभिनंदन केलं. मोदींच्या विजयानंतर अनेक देशांमधून संदेश आला पण भारताचा शेजारी देश पाकिस्तानातून मोदींना शुभेच्छा देणारा कोणताही संदेश आला नव्हता. पण अखेर नंतर पाकिस्तानातून अभिनंदनाचा संदेश आला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नरेंद्र मोदींचं तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने अभिनंदन केले आहे. नवाझ शरीफ यांच्या आधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे शाहबाज म्हणाले होते.

काय म्हणाले नवाझ शरीफ?

नवाझ शरीफ यांनी ते सोशल मीडियावर म्हटले की, “तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मोदी जी (@narendramodi) यांचे माझे हार्दिक अभिनंदन.” नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुमच्या पक्षाला मिळालेले यश तुमच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दर्शवते. द्वेषाची जागा आशेने घेऊ आणि दक्षिण आशियातील दोन अब्ज लोकांचे नशीब घडवण्याच्या संधीचे सोने करूया.”

पीएम मोदींनी काय दिले उत्तर

नवाझ शरीफ यांच्या बंधपत्राला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील जनता नेहमीच शांतता, सुरक्षा आणि पुरोगामी विचारांच्या बाजूने राहिली आहे.

रविवारी झालेल्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंडे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ हेही राष्ट्रपती भवनात झालेल्या भव्य समारंभात उपस्थित होते.

भारत-पाकिस्तान संबंध अजूनही तणावाचे

भारतीय संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले होते. भारताने याबाबतीत पाकिस्तानला हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. भारताने म्हटले की, पाकिस्तानशी सामान्य शेजारी संबंध हवे आहेत आणि चांगल्या संबंधांसाठी इस्लामाबादला दहशतवाद आणि शत्रुत्वापासून मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.