घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा; मोदींचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश

| Updated on: May 15, 2021 | 4:16 PM

देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्च स्तरीय बैठक घेतली. (PM Modi reviews covid-19, vaccination drive in high-level meeting)

घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करा; मोदींचे उच्चस्तरीय बैठकीत आदेश
Follow us on

नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्च स्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाच्या टेस्ट करा, असे आदेश देतानाच अनेक राज्यांकडून व्हेंटिलेटरचा वापर केला जात नसल्याबद्दल मोदींनी नाराजीही व्यक्त केली. (PM Modi reviews covid-19, vaccination drive in high-level meeting)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी अधिकाऱ्यांनी मोदींना कोरोना परिस्थितीची माहिती दिली. देशात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मार्चच्या सुरुवातीला सुमारे 50 लाख चाचण्या करण्यात येत होत्या. आता जवळपास 1.3 कोटी चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मोदींना दिली. तसेच पॉझिटिव्हिटी रेट घटत असून रिकव्हरी रेट वाढत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी आरोग्य अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी जिल्हास्तरापासून कोरोनाची स्थिती, ऑक्सिजनची उपलब्धता आणि लसीकरणाची माहितीही देण्यात आली.

चाचण्या वाढवा

आरटी पीसीआर आणि रॅपिड टेस्टची संख्या वाढवण्यात यावी. कोणत्याही दबावाशिवाय राज्यांनी कोरोना रुग्णांची संख्या दाखवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा, असंही मोदी म्हणाले. घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी करा. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढवा. आवश्यकता भासल्यास अंगवाडी सेवकांनाही सोबत घेण्यास त्यांनी सांगितलं. ग्रामस्थांना गृहविलगीकरणाचे नियम सोप्या आणि समजेल अशा भाषेत समजावून सांगा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

व्हेंटिलेटरचं ऑडिट करा

काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटरचा उपयोग योग्य प्रकारे होत नसल्याच्या रिपोर्टची मोदींनी गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारने दिलेल्या व्हेंटिलेटरचं ऑडिट करा, आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर चालवण्याचं प्रशिक्षण द्या, अशा सूचना करतानाच व्हेंटिलेटरचा योग्य वापर होत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. (PM Modi reviews covid-19, vaccination drive in high-level meeting)

 

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या काळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल: चंद्रकांत पाटील

भावाचा कोरोनाने मृत्यू, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय, पश्चिम बंगालमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर

Tauktae Cyclone: चक्रीवादळ राज्यात धडकणार नाही, पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना

(PM Modi reviews covid-19, vaccination drive in high-level meeting)