नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजात स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचं (Statue Of Equality) लोकार्पण करणार आहेत. हैदराबाद (Hyderabad) येथे हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. स्वामी रामानुजाचार्य (Sant Ramanujacharya) यांच्या पुतळ्याचं लोकार्पण ही त्यांना योग्य श्रद्धांजली ठरणार आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रामानुजाचार्य स्वामींची ही मूर्ती 216 मीटर उंचीची आहे. रामानुजाचार्य यांनी आस्था, जाती आणि पंथासहीत सर्व बाबतीत समानतेचा विचार मांडला होता. ही मूर्ती पंचधातूची बनलेली आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्तपासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. बैठ्या अवस्थेतील ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. 54 फूट उंच आधार भवनावर ही मूर्ती बांधण्यात आली असून या मूर्तीला ‘भद्र वेदी’ हे नाव देण्यात आलं आहे. आज संध्याकाळी एका खास सोहळ्यात या मूर्तीचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या सोहळ्याबाबतची माहिती दिली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या उद्घाटन सोहळ्याला मी जाणार आहे. ही श्री रामानुजाचार्य स्वामी यांना योग्य श्रद्धांजली असेल. त्यांचे विचार आणि शिकवण सदैव आपल्याला प्रेरणा देत असते, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भद्र वेदीत वैदिक डिजीटल पुस्तकालय आणि संसाधन केंद्र, प्राचीन भारतीय ग्रंथ, एक थिएटर आदीचं संचलन केलं जातं.
रामानुजाचार्य आश्रमातील चिन्ना जीयर स्वामी यांनी या मूर्तीची संकल्पना मांडली आहे. लोकार्पण सोहळ्या दरम्यान रामानुजाचार्य यांचा जीवन प्रवास आणि शिकवणीवर आधारीत थ्रीडी प्रेजेंटेशन मॅपिंगचंही प्रदर्शन होणार आहे. पंतप्रधान मोदी यावेळी 108 दिव्य देशमचीही पाहमी करणार आहेत. राष्ट्र, लिंग, वंश, जात आणि पंथाचा विचार न करता रामानुजाचार्य यांनी प्रत्येक मानावाच्या विकासासाठी काम केलं होतं.
रामानुजाचार्य यांचं हे 1000वं जन्मवर्ष आहे. या निमित्ताने 12 दिवसांचा रामानुजाचार्य सहस्त्राब्दी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दिव्य साकेतम, मुचिन्तलची विशाल अध्यात्मिक मूर्ती जगप्रसिद्ध व्हावी हे चिन्ना जीयर यांचं स्वप्न आहे. या मेगा प्रकल्पावर एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही मूर्ती बनवण्यासाठी 1800 टन पंचधातूंचा उपयोग करण्यात आला आहे. पार्कात चोहो बाजूने 108 दिव्यदेशम मंदिर बनविण्यात आले आहेत. या मंदिराच्या दगडी खांबांना राजस्थानात विशेष कारागिरी करण्यात आली आहे.
At 5 PM, I will join the programme to inaugurate the ‘Statue of Equality.’ This is a fitting tribute to Sri Ramanujacharya, whose sacred thoughts and teachings inspire us. https://t.co/i6CyfsvYnw
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2022
संबंधित बातम्या: