Man ki Baat: पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चा लोकांवर खोलवर परिणाम, जाणून घ्या सर्वेक्षणात काय आलं पुढे

| Updated on: Apr 29, 2023 | 9:45 PM

पंतप्रधान मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम देशभरात लोकप्रिय आहे. करोडो लोकं दर महिन्याला ते आवर्जुन ऐकत असतात. मोदींची १०० वा मन की बात कार्यक्रम उद्या प्रसारित होणार आहे.

Man ki Baat: पंतप्रधान मोदींच्या मन की बातचा लोकांवर खोलवर परिणाम, जाणून घ्या सर्वेक्षणात काय आलं पुढे
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर लोकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी मन की बात सुरु केलं. ज्यामध्ये ते दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी लोकांसोबत संवाद साधतात. पण या पंतप्रधान मोदींच्या या मन की बात कार्यक्रमाने लोकांना खूप प्रभावित केले. अभ्यासानुसार, हा कार्यक्रम ऐकल्यानंतर 60 टक्के लोकांमध्ये राष्ट्र उभारणीची भावना विकसित झाली. तर 63 टक्के लोकांनी सांगितले की, हे ऐकल्यानंतर त्यांचा सरकारबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाबाबत एक अभ्यासात असे समोर आले आहे.

मन की बात @ 100

प्रसार भारतीने हा अभ्यास आयआयएम रोहतककडून करून घेतला आहे. या अभ्यासात अनेक मनोरंजक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रसार भारतीने हा अभ्यास हिंदी तसेच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये करून घेतला. 30 एप्रिल रोजी मन की बातचा 100 वा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की आतापर्यंत १०० कोटी म्हणजेच १ अब्ज लोकांनी एकदा तरी मन की बात कार्यक्रम ऐकला आहे. तर 23 कोटी लोक हे नियमितपणे ऐकत आहेत.

मन की बात संदर्भात समोर आलेल्या अभ्यासानुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 96 टक्के लोकांना पीएम मोदींच्या लोकप्रिय कार्यक्रमाची माहिती आहे. 17.6 टक्के लोक रेडिओवर मन की बात ऐकतात. मोबाईलवर मन की बात ऐकणाऱ्यांची संख्या 37.6 टक्के आहे. याशिवाय जवळपास ४४.७ टक्के लोक टीव्हीवर हा कार्यक्रम पाहतात. या अभ्यासात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.

हा कार्यक्रम 65 टक्के लोक हिंदीत आणि 18 टक्के इंग्रजीत ऐकतात. या सर्वेक्षणात 10,003 लोकांनी भाग घेतला. हे सर्वेक्षण देशातील पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोनमध्ये करण्यात आले. यामध्ये प्रत्येक झोनमधील 2500 लोकांनी सहभाग घेतला.

लोकांवर काय परिणाम झाला

पीएम मोदींच्या मन की बात कार्यक्रमाने लोकांवर खूप प्रभाव टाकल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ६० टक्के लोकांमध्ये राष्ट्र उभारणीची आवड निर्माण झाली. त्याच वेळी, 63 टक्के लोकांनी सांगितले की, हे ऐकल्यानंतर त्यांचा सरकारबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. ५५ टक्के लोकांनी जबाबदार नागरिक असल्याचे सांगितले यावरून मन की बातचा देशातील जनतेवर किती खोल परिणाम झाला हे तुम्ही समजू शकता. 58 टक्के लोकांनी आपली जीवनशैली सुधारल्याचे सांगितले.

लोकांना पंतप्रधान मोदींशी जोडलेलं वाटतं

या अभ्यासात असेही समोर आले आहे की लोक पीएम मोदींना शक्तिशाली नेता मानतात. ते त्यांना निर्णय घेणारा नेता मानतात. जो प्रेक्षकांशी भावनिक संबंध प्रस्थापित करतात. या कार्यक्रमात ते ज्या पद्धतीने लोकांशी थेट संवाद प्रस्थापित करतात. त्यातून लोकांना मार्गदर्शन मिळते.

ते स्वत:ला थेट पंतप्रधान मोदींशी जोडलेले समजतात. पीएम मोदींबद्दल त्यांचा असा समज आहे की ते जाणकार आणि सहानुभूती असलेले पंतप्रधान आहेत. रेडिओवरील पीएम मोदींचा मन की बात कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झाला आणि तो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो.

बिल गेट्स यांच्याकडून मोदींचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा 100 वा भाग रविवारी रेडिओवर प्रसारित होणार आहे. हा एपिसोड अविस्मरणीय बनवण्यासाठी भाजप विशेष तयारी करत आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी मन की बातच्या 100 भागांसाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे