PM Modi Speech : घर घेणाऱ्यांसाठी, गावातील महिलांसाठी पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन महत्त्वाची घोषणा

| Updated on: Aug 15, 2023 | 9:22 AM

PM Modi Speech : पंतप्रधान मोदींनी कुठल्या योजना जाहीर केल्या?. या कालखंडात जे निर्णय होतील, ते पुढच्या 1000 वर्षाची दिशा निश्चित करतील, असं पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

PM Modi Speech : घर घेणाऱ्यांसाठी, गावातील महिलांसाठी पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन महत्त्वाची घोषणा
PM Modi
Follow us on

नवी दिल्ली : देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशात सेलिब्रेशन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 व्यां दा लाल किल्ल्यावरुन ध्वाजारोहण केलं. राष्ट्राला संबोधित केलं. पीएम मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन अनेक नवीन योजनांची घोषणा केलीय. अनेक नवीन आश्वासन दिली. वर्ष 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी यांचं लाल किल्ल्यावरुन हे शेवटच संबोधन आहे. या भाषणाचे अनेक राजकीय अर्थ आहेत. या कालखंडात जे निर्णय होतील, ते पुढच्या 1000 वर्षाची दिशा निश्चित करतील, असं पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

# विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने लोकांसाठी विश्‍वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली. विश्वकर्मा योजनेत 15 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

# देशात आतापर्यंत 10 हजार जन औषधी केंद्र होती. आता हे लक्ष्य 25 हजार औषधी केंद्राच केलं आहे. म्हणजे अजून 15 हजार जन औषधी केंद्र सुरु होतील. ही मोदीची गॅरेंटी आहे, पुढच्या पाच वर्षात भारताचा पहिल्या टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल.

# शहरात जे लोक भाड्याच्या घरात राहतात. ज्यांच्याकडे स्वत:च घर नाही. जे अनधिकृत कॉलनीमध्ये राहतात. घर घेण्यासाठी बँकांकडून लोन मिळतं. त्यांना व्याजात सवलत दिली जाईल. त्यासाठी लवकरच घोषणा केली जाईल.

# माझ लक्ष्य गावांमध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवायच आहे. एग्रीकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आम्ही वुमेन सेल्फ हेल्प ग्रुपची ट्रेनिंग देऊ. यात महिलांना ड्रोन चालवण्याच प्रशिक्षण देण्यात येईल. आम्हाला गावात महिलांना मजबूत करायच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

# देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांचं मार्गदर्शन, भगत सिंह-सुखदेव-राजगुरुसारख्या वीरांच बलिदान नेहमी लक्षात ठेवलं जाईल. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, त्यांना नमन करतो. यावर्षी 26 जानेवारीला 75 वा प्रजासत्ताक दिन असेल. हा आमच्यासाठी इतिहास आहे.

# मणिपूरसह देशाच्या काही भागात हिंसाचार झाला. अनेक लोकांनी आपलं जीवन गमावलं. आई-मुलीच्या सन्मानाशी खेळ झाला. आता शांततेच्या बातम्या येत आहेत. देशातील जनता मणिपूरसोबत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमिळून शांतता प्रस्थापित करेल.

# देशाने एक हजार वर्षाची गुलामी पाहिली आहे. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पुन्हा एकदा देशाला संधी मिळाली आहे. आता आपण जे करु, त्याचा परिणाम पुढच्या 1000 वर्षात दिसून येईल. भारत माता पुन्हा एकदा जागृत झाली आहे. हा कालखंड देशाला पुढे घेऊन जाईल.