नवी दिल्ली : शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारधर्म पाळला. सध्या भारत-पाकिस्तानच्या संबंधात मोठ्या प्रमाणात कटुता आहे. दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी ही कटुता बाजूला ठेऊन शेजारधर्माचा पालन केलं. त्यांनी नवीन पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना शुभेच्छा दिल्या. पीएम मोदी यांनी सोशल मीडियावर टि्वट केलं. “पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या शहाबाज शरीफ यांना माझ्याकडून शुभेच्छा” शहबाज शरीफ यांनी दुसऱ्यांदा पाकिस्तानी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
पाकिस्तानी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शहबाज यांना पदाची शपथ दिली. 2022 नंतर ते दुसऱ्यांदा देशाच नेतृत्व संभाळणार आहेत. पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे, अशा स्थितीत शहाबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानच नेतृत्व करणार आहेत. दुसऱ्यांदा पंतप्रधान बनताच शहबाज यांनी भारताविरोधात गरळ ओकली.
शहबाज शरीफ काश्मीरबद्दल काय म्हणाले?
नॅशनल असेंबलीमधील संबोधनात त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी त्यांनी केली. काश्मीरमध्ये निरपराधांचा बळी जातोय असं पीएमएलएन अध्यक्ष म्हणाले. “काश्मीर खोऱ्यात रक्त वाहतय, पण सगळ जग शांत आहे. आम्ही समानतेच्या आधारावर शेजाऱ्यांसोबत संबंध ठेऊ” असं शहबाज शरीफ म्हणाले. पाकिस्तानची निम्मी लोकसंख्या दारिद्रय रेषेखाली आहे. मात्र, अशा स्थितीतही ते काश्मीरवर बोलत आहेत.
Congratulations to @CMShehbaz on being sworn in as the Prime Minister of Pakistan.
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2024
इम्रान खान यांच्या पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला किती मत?
पाकिस्तानी संसद भंग होण्याआधी एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 मध्ये महाआघाडी सरकारचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कामकाज केलं. रविवारी पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे संयुक्त उमदेवार शहबाज शरीफ यांना 336 सदस्यांच्या सभागृहात 201 मत मिळाली. तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफच्या (पीटीआई) उमर अयूब खान यांना 92 मत मिळाली. नेशनल असेंबलीचे अध्यक्ष सरदार एयाज सादिक यांनी निकाल जाहीर करताना, शहबाज यांना पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं होतं.