मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या व्यक्तिमत्त्वात एक जादू आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक बडा नेता, सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करतो. पंतप्रधानांच कुशल व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व गुण जगातील अनेक नेत्यांना भावले आहेत. 2014 साली पंतप्रधान मोदी अमेरिका (America) दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मेडिसन स्क्वेयर येथून भाषण करताना त्यांनी आपली छाप उमटवली होती. अमेरिकेतील तमाम भारतीयांच मन जिंकलं होतं. त्यावेळी बराक ओबामा (Obama) अमेरिकेचे राष्ट्रपती होते. माय फ्रेंड ओबामा म्हणून मोदी त्यांना संबोधित करायचे. मोदींच्या कार्यकाळात अमेरिकेसोबत संबंध दृढ झाले आहेत. पण म्हणून मोदी अमेरिकेच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करत नाहीत. अलीकडे ज्यो बायडेन यांनी ट्रम्प प्रशासनाचा एक निर्णय बदलला.
F-16 वरुन अमेरिकेला स्पष्टच सांगितलं
पाकिस्तानसोबत पुन्हा एकदा संरक्षण सहकार्य सुरु करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यात F-16 ही फायटर विमाने आहेत. पाकिस्तान सध्या कर्जामध्ये बुडाला आहे. या फायटर जेट्सच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी अमेरिकेने मदत करण्याचा निर्णय घेतला. बायडेन सरकारने अमेरिकेला 3580 कोटी रुपयांची मोठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान मोदींच परराष्ट्र धोरण स्पष्ट आहे
भारताच्या दृष्टीने अमेरिकेचा हा निर्णय चिंता वाढवणारी बाब आहे. भारताने तात्काळ अमेरिकेला आपली नाराजी कळवली. अशा निर्णयांमुळे दोन्ही देशातील संबंध चांगले राहणार नाहीत. अस्वस्थतात वाढेल, असं भारताकडून सांगण्यात आलं. याचाच अर्थ पंतप्रधान मोदींची निती स्पष्ट आहे. अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टीच ते समर्थन करत नाहीत. भारताच्या हिताच्या आड येणाऱ्या मुद्यांवरही भारताचं परराष्ट्र धोरण साफ आहे.
रशिया-युक्रेन युद्धात भारताची भूमिका
रशिया-युक्रेन युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली, ते सुद्धा मोदी सरकारच्या परराष्ट्र नितीच यश आहे. आपण भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या QUAD देशांचे सदस्य आहोत. क्वाड ग्रुपचे देश रशियाचे कट्टर विरोधक आहेत. रशिया भारताचा जुना मित्र आहे. भारत अमेरिका-युरोपच्या दबावाखाली झुकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धाच कुठेही समर्थन केलं नाही. पण रशियाचा विरोधही केला नाही. संरक्षण सहकार्य क्षेत्रात रशिया आपला जुना भागीदार आहे, हे लक्षात ठेवलं. जगातील अनेक देशांनी रशियावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल विकत घेणं सुरु ठेवलं, जेणेकरुन सर्वसामान्य भारतीयांना दिलासा मिळेल. आज रशिया आणि अमेरिकेसाठी भारत आपलं महत्त्वाच स्थान टिकवून आहे. हेच मोदींच्या परराष्ट्र नितीच मोठं यश आहे.
वेगाने आर्थिक विकास
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु म्हणाले होते की, परराष्ट्र नीति आपल्या आर्थिक नीतिचा परिणाम असते. आज संपूर्ण जगात भारत वेगाने आर्थिक विकास साध्य करत आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जातेय. 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यात ब्रिटनला मागे सोडून आपण जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनलो.