नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत आज (24 जून) सुरू झालीय. मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 8 राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलंय. त्यामुळे या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पंतप्रधान मोदींशिवाय गृह मंत्री अमित शाह, जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, प्रधान सचिव पीके मिश्रा, गृह सचिव अजय भल्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत (PM Narendra Modi meet Jammu Kashmir all party leaders in Delhi).
PM @narendramodi is Chairing an All-Party meeting with various political leaders from Jammu and Kashmir. pic.twitter.com/nIUaV6qwF0
— PMO India (@PMOIndia) June 24, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुपकार गटाच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
#WATCH Prime Minister Narendra Modi holds meeting with Jammu and Kashmir leaders in Delhi pic.twitter.com/8nDYDzdTfy
— ANI (@ANI) June 24, 2021
दरम्यान या बैठकीत जम्मू काश्मीरमधील विकास कामांविषयी चर्चा होईल असं सांगितलं जातंय. यात इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र शासित प्रदेशात रस्ते, वीज आणि पाण्यासारख्या मुलभूत बाबींवर काय काम झालंय याचीही माहिती देण्यात येणार आहे.
PM Narendra Modi meet Jammu Kashmir all party leaders in Delhi