नवी दिल्ली: ससंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांनीही मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला उपस्थित होते. सोनिया गांधी यांनी हातजोडून भाजप नेत्यांना नमस्कार केला. राजनाथ सिंह यांनीही त्यांना नमस्कार दिला. मात्र, सोनिया गांधी नमस्कार करत असताना मोदींची नजर खालीच होती. सोनिया गांधी मोदींना नमस्कार करतानाचा हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंतप्रधानांनी आज सोनिया गांधी यांच्याशिवाय समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव, टीआर बालू, फारुख अब्दुल्ला आणि अधीर रंजन चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आज लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर संसदेची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि चर्चा आणि संवादाचा स्तर अधिक उंचावण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे, असं सर्व नेत्यांना सांगितलं. सर्व पक्षाचे नेते यासाठी सक्रिय सहभाग नोंदवतील याची आशा आहे, असं ओम बिरला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सोनिया गांधी दिसत आहेत. सोनिया गांधी यांनी मास्क लावलेला आहे तर इतर एकाही नेत्याने मास्क लावलेला नाही. सोनिया गांधी या हॉलमध्ये आल्यानंतर नमस्कार करताना दिसत आहेत. राजनाथ सिंहही यांचे हातही नमस्कार करण्यासाठी उठताना दिसत आहेत. ओम बिरला यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा गंभीर दिसत असून त्यांची नजर खाली असलेली दिसत आहे.
निर्धारित कार्यक्रमाच्या एक दिवस आधी अनिश्चित काळासाठी संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार संसदेचं अधिवेशन 8 एप्रिलपर्यंत चालणार होतं. संसदेचं कामकाज सुरू होताच ओम बिर्ला म्हणाले की, या अधिवेशनाचं कामकाज 177 तास 50 मिनिटे चाललं. यावेळी 182 तारांकित प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. 31 जानेवारी रोजी सुरू झालेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केलं.
लोकसभा की कार्यवाही अनिश्चितकाल के लिए स्थगित होने के बाद सभी दलों के नेताओं से आग्रह किया कि सदन की गरिमा को बढ़ाने तथा चर्चा- संवाद के स्तर को और ऊंचा उठाने के लिए सामूहिक प्रयासों की आवश्यकता है। आशा है सभी दल इसमें सक्रिय सहयोग देंगे। pic.twitter.com/AMQPuD3SgR
— Om Birla (@ombirlakota) April 7, 2022
संबंधित बातम्या:
BJP Foundation Day 2022: नियत, नीती ते घराणेशाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 5 मुद्दे