Marathi News National PM narendra modi oath ceremony possible minister of Modi government
Modi swearing-in ceremony: उत्तर प्रदेशाला सर्वाधिक मंत्रीपदं, महाराष्ट्राच्या वाट्याला किती?
नरेंद्र मोदी 3.0 सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची यादी आमच्या हाती आली आहे. या यादीनुसार, उत्तर प्रदेशाला सर्वाधिक मंत्रिपदं देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील 9 खासदारांना संभाव्य मंत्रिपदं देण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ बिहारमधील 8 खासदारांना संभाव्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा आज पार पडला आहे. नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या काही मंत्र्यांनी देखील गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
Follow us on
भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएचे 69 खासदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. नरेंद्र मोदी 3.0 सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची यादी आमच्या हाती आली आहे. या यादीनुसार, उत्तर प्रदेशाला सर्वाधिक मंत्रिपदं देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील 9 खासदारांना संभाव्य मंत्रिपदं देण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ बिहारमधील 8 खासदारांना संभाव्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात येत आहे. यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतोय. महाराष्ट्रातील 6 खासदारांना संभाव्य मंत्रिपदाची जबाबदारी मिळत आहे. यामध्ये दोन खासदार हे तरुण खासदार आहेत. महाराष्ट्रानंतर गुजरातमधील 5 खासदारांना आज संभाव्य मंत्रिमंडळात स्थान दिलं जात आहे.