नवी दिल्ली : सध्या सगळीकडे परीक्षेचं वातावरण आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी मेहनत देखील घेतायेत. अशातच विद्यार्थ्यांना परीक्षेचा कोणताही ताण येऊ नये, विद्यार्थ्यांनी तणावरहीत परीक्षेला सामोरं जावं, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा 2022’ हा कार्यक्रम आज सकाळी अकरा वाजता नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेच्या तयारीच्या पद्धती, तणावमुक्ती यासह विविध विषयांवर देसभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा की बात, पीएम के साथ’या मोठ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाचा उद्देश मुलांसाठी परीक्षेच्या वेळी तणामुक्त वातावरण निर्माण करणे आणि प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र आणणे, हा आहे.
सूत्रसंचालन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांकडून कौतुक
गुणांचे पुजारी बनलं पाहिजे, चांगल्या गोष्टी स्विकारल्या पाहिजे
सगळ्यांनी लसीकरण करुन कर्तव्याचं पालन केलंय आहे
इतर देशात लसीकरणासंदर्भातील प्रश्न कुणी विचारू नाही शकत
प्लास्टिकला लगाम लावण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे
जुन्या गाड्यांवर लगाम लावण्याचे प्रयत्न
आरोग्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पाळा
पी थ्री गोष्टी पाळा
देशाच्या अमृत महोत्सवावर पंतप्रधान मोदी बोलतायेत
पर्यावरण, स्वच्छता आणि ग्लोबल वार्मिंगवर पंतप्रधान बोलतायेत
आपण आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे
कोणत्याही सरकारी उपक्रमातून कोणतंही काम पूर्ण होत नाही
प्लास्टिकचा उपयोग टाळा
पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदा लाल किल्ल्यावरुन भाषण करत होतो
त्यावेळी माझ्यावर टीका झाली होती
स्वच्छतेविषयी बोलताना अनेकांना माझ्या भाषणावर आश्चर्य वाटलं होतं
पर्यावरणावर पंतप्रधान मोदी बोलतायेत
स्वच्छतेचं संपूर्ण श्रेय विद्यार्थ्यांना-पंतप्रधान
समाजात शिक्षेविषयी सन्मानाचा भाव आहे
शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महिला आहेत
प्रत्येक क्षेत्रात महिलांचा अधिक सहभाग आहे
मुलगा आणि मुलीमध्ये फरक करू नका
पंतप्रधान ग्रामीण भागातील शिक्षणाविषयी बोलतायेत
ग्रामीण भागातील शिक्षणाविषयी पंतप्रधानांना प्रश्न
ग्रामीण भागातील परिस्थिती आता बदलली आहे
समाज मुलींच्या सामर्थ्याला जाणून घेण्यात मागे राहिला
तर तो समाज कधीही पुढे नाही जाऊ शकत
मी अशा अनेक मुली पाहिल्या ज्यांनी आपल्या परिवारासाठी लग्न नाही केलं
वृद्धाश्रमात आई-वडिलांना पाठवलेली मुलं देखील मी पाहिली आहे
शाळेत येणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक-पंतप्रधान
स्पर्धा जास्त असली तरी अनेक पर्याय आहेत
स्पर्धा गरजेची आहे, स्पर्धेला सामोरं जावं
स्पर्धापासून पळू नका
आम्हाला जे मिळालं नाही, त्या गोष्टी आज तुम्हाला मिळतायेत
फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका,
स्वत:चा विकासही त्यातून करा-पंतप्रधान
जम्मू आणि काश्मीर
पुलवामामध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पोलीस आणि सीआरपीएफची कारवाई
3 दहशतवाद्याना अटक
संशयित लष्कर ए तोयबा संघटनेशी संबंधित
पुलवामा जिल्ह्यातील दहशतवाद्यांना रसद पुरवत होते
1 रायफल, तीन मॅगझिन आणि 69 राऊंड जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
तालकटोरा स्टेडियम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन
नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना फायदा
परीक्षा पे चर्चा – पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम
आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात पण ते चढ-उतार विद्यार्थ्यांना पार करायचे असतात
अनुभवातून आपण खूप काही शिकत जातो परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी मनात भीती बाळगू नये तुम्ही यापूर्वी अनेक परीक्षा दिल्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या तयारी वर विश्वास ठेवा
पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
जम्मू काश्मिरमधील विद्यार्थीनीचा पंतप्रधानांना प्रश्न
जम्मू-काश्मिरसह उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचाही पंतप्रधानांना प्रश्न
देशातील विविध भागातल्या विद्यार्थ्यांकडून पंतप्रधानांना प्रश्न
ज्या गोष्टीत आनंद वाटतो ते करा
त्यातूनही वेळ काढून आधी अभ्यासाला महत्व द्या
आवडीच्या गोष्टी करा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष्य नको-पंतप्रधान
आपल्याला जे आवडं त्यासाठीच आपण वेळ देऊ लागतो
पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देतायेत
महात्मा गांधींच्या विचारांचाही दिला दाखला
वेळेचं महत्व लक्षात घ्या
आपण एकदा केलेलं काम पडताळून पाहा
वेळेच्या महत्वाविषयी पंतप्रधान बोलतायेत
प्रोत्साहित करण्यासंदर्भात पंतप्रधान बोलतायेत
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पंतप्रधान उत्तर देतायेत
पूर्वी शिक्षक विद्याथ्यांच्या कुटुंबाशी जोडलेले असायचे
आज मुलं दिवसभर काय करतात, ते पालकांना माहीत नसतं
पालक आणि शिक्षकांच्या दबावाविषयी किरणप्रीतचा प्रश्न
किरणप्रीतच्या प्रश्नांचं पंतप्रधानांकडून कौतुक
पंजाबमधून किरणप्रीतचा पंतप्रधानांना प्रश्न
पंतप्रधान रोषणी आणि किरणप्रीत यांच्या प्रश्नावर उत्तर देतायेत
नव्या शैक्षणित धोरणाचं अवलंब करण्याचं पंतप्रधानांकडून आवाहन
कौशल्य, क्रीडा अभ्यासक्रमात आणल्याचा पुनरुच्चार
कौशल्याचं महत्व जगभरात वाढलं
कौशल्याला आम्ही अभ्यासक्रमाचा भाग बनवलं
आपण नव्या युगानुसार बदललं पाहिजे
आपन एकविसाव्या शतकानुसार बदललं पाहिजे
नव्या शैक्षणिक धोरणात खेळाला विशेष महत्व
खेळ विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा
अलीकडेच खेळांमध्ये विद्यार्थी आवड दाखवतायेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
सरकारने काहीही केलं तरी विरोध होतोच
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी विद्यार्थीनीकडून प्रश्न
2014पासून आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर काम करत आहे
ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या फरकांविषयी पंतप्रधान बोलतायेत
नोट्स संदर्भातही पंतप्रधानांकडून मार्गदर्शन
गुरुकुलचं पंतप्रधानांकडून उदाहरण
युग बदलला की माध्यमंही बदलतात
नवे तंत्रज्ञान आपण सहज अवगत करुन शिकू शकतो
पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत
तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रिल पाहता-पंतप्रधान
मन वेगळ्याच ठिकाणी असते, तुम्ही फक्त क्लासला ऑनलाईन हजर असतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थांशी संवाद सुरू आहे
कर्नाटकातील तरुण हा विद्यार्थी प्रश्न विचारला आहे
दिल्लीच्या साहीद अली हा देखील पंतप्रधानांना प्रश्न विचारत आहे
भीती निर्माण होईल असं वातावरण होऊ देऊ नका
रोजच्या दिनचर्येप्रमाणे परीक्षेच्या काळात रहा
जो अभ्यास झाला आहे, त्यावर आत्मविश्वास ठेवा
आपण अनेकदा परीक्षा दिल्या आहेत
परीक्षा देण्यासाठी का घाबरता
परीक्षा जीवनाचा एक भाग आहे-पंतप्रधान
तुमच्या मनात भीती का असते, हा प्रश्न मला पडला
पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलतायेत
खुशी जैन विचारतेय पंतप्रधानांना प्रश्न
जेव्हा आपण घाबरलेलो असतो तेव्हा आपण परीक्षेची तयारी कशी करावी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थांशी संवाद
पंतप्रधानांकडून सण-उत्सवाच्या शुभेच्छा
मोठ्या कालावधीनंतर मी तुम्हाला भेटतो आहे
कोरोनामुळे मी तुम्हाला भेटू नाही शकलो-पंतप्रधान
काही वेळातच पंतप्रधान घेणार वर्ग
देशभरातील विद्यार्थी पंतप्रधानांना ऐकण्यासाठी उत्सुक
पंतप्रधान देशभरातील विद्यार्थी, पालकांशी संवाद साधणार
‘परीक्षा पे चर्चा 2022’ या कार्यक्रम विद्यार्थी उत्साही
‘परीक्षा की बात, पीएम के साथ’विषयी देशभरात चर्चा
पंतप्रधान काय बोलणार, याकडे देशभराचं लक्ष
तालकटोरा स्टेडियममधलं प्रदर्शन पंतप्रधान बघत आहेत
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकराची पेंटिंग बनवल्या आहेत
पंतप्रधान विद्यार्थ्यांकडून पेटिंगविषयी जाणून देखील घेत आहेत
विद्यार्थी पंतप्रधानांना प्रदर्शनातील कलाकृतींविषयी माहिती देतायेत
थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
पंतप्रधानांना ऐकण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत
प्रदर्शनात पारंपरिक खेळणे, विविध रंगांच्या पेटिंग
पंतप्रधान पेटिंगसंदर्भात जाणून घेतायेत
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पेटिंगचं पंतप्रधानांकडून कौतुक
थोड्याच वेळात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
पंतप्रधान काय बोलणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष