नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्षाच्या शेवटच्या मन की बातमध्ये पुण्याच्या भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचा गौरव केला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटने महाभारतावर ऑनलाईन कोर्स सुरू केला. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून वाचनाचं महत्त्व अधोरेखित केलं. वाचनाचं महत्व सांगतानाच देशात वाचन संस्कृतीशी निगडीत सुरू असलेल्या प्रयोगावरही त्यांनी भाष्य केलं. नुकतंच माझं लक्ष एका जबरदस्त प्रयत्नाकडे वेधलं गेलं. आपले प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्य भारतच नव्हे तर जगभरात लोकप्रिय बनविण्याचा हा प्रयत्न आहे. पुण्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. या संस्थेने महाभारताचं महत्त्व अधोरेखित करणारा ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे. देशभरातील लोकांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. हा कोर्स भलेही आता सुरू झाला असेल मात्र, या कोर्समध्ये जो कंटेट शिकवला जातो तो तयार करण्याची सुरुवात शंभर वर्षापूर्वीच झाली होती, असं मोदींनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सर्बियन स्कॉलर डॉ. मोमिर निकीच यांचंही उदाहरण दिलं आहे. निकीच यांनी सर्बियन भाषेची एक डिक्शनरी तयार केली आहे. त्यात संस्कृत भाषेतील 70 हजार शब्द घेतले आहेत. यावरून जगभरात भारतीय संस्कृती जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतं. तसेच आपली संस्कृती वाढवण्यासाठीही जगातील अनेक लोक हातभार लावत असल्याचंही दिसून येत असल्याचं मोदींनी सांगितलं.
निकीच यांनी केवळ संस्कृत शब्दच डिक्शनरीत आणले नाहीत, तर वयाच्या 70व्या वर्षी ते संस्कृत भाषा शिकले आहेत. महात्मा गांधींचे लेख वाचून आपल्याला ही प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. असंच उदाहरण मंगोलियाचे प्राध्यापक जे. गेंदेधरम यांचं देता येईल. गेंदेधरम हे 93 वर्षाचे आहेत. त्यांनी गेल्या चार दशकात भारतातील 40 प्राचीन ग्रंथ आणि महाकाव्यांचा मंगोलियन भाषेत अनुवाद केला आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मोदींनी दरवर्षीप्रमाणं विद्यार्थ्यांशी परीक्षेपूर्वी संवाद साधण्याचं नियोजन करत असल्याचं जाहीर केलं. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 28 डिसेंबरपासून नोंदणीला सुरुवात करत आहोत. 28 डिसेंबरपासून mygov.in या वेबसाईटवर होईल. ही प्रक्रिया 28 डिसेंबर 20 जानेवारीपर्यंत सुरु राहील. यासाठी 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक नोंदणी करु शकतात. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
It is our duty to preserve and popularise our culture.
It is equally gladdening to see global efforts that celebrate Indian culture. #MannKiBaat pic.twitter.com/bEsZTo8x8y
— PMO India (@PMOIndia) December 26, 2021
संबंधित बातम्या:
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत बाका प्रसंग; राज्यपालांच्या हाती निवडणुकीची दोरी, पुढे काय होणार…?