नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपला पंजाब दौरा अचानक रद्द केल्यानं राष्ट्रीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकारानंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. तर नड्डा यांच्या टीकेला आता काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
‘प्रिय नड्डाजी, पंतप्रधान मोदी यांची रॅली रद्द होण्यामागे मुख्य कारण हे रिकाम्या खुर्च्या होतं. विश्वास बसत नसेल तर हे पाहा. अर्थहीन भाषणबाजी नको. शेतकरी विरोधी मानसिकतेचं सत्य स्विकारा आणि आत्मचिंतन करा. पंजाबमधील जनतेनं रॅलीपासून दूर राहत अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे’, अशी घणाघाती टीका सुरजेवाला यांनी केलीय.
प्रिय नड्डा जी,
रैली रद्द होने का कारण ख़ाली कुर्सियाँ रहीं।
यक़ीन न हो तो, देख लीजिए ?और हाँ, बेतुकी बयानबाज़ी नहीं,
किसान विरोधी मानसिकता का सच स्वीकार कीजिए और आत्म मंथन कीजिए ।पंजाब के लोगों ने रैली से दूरी बनाकर अहंकारी सत्ता को आईना दिखा दिया है। pic.twitter.com/jhgrsqOv1t
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 5, 2022
पंतप्रधान मोदी हे आज पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा ताफा द्या मार्गावरुन जाणार असतो तो मार्ग पूर्ण रिकामा करण्यात येतो. मात्र, पंतप्रधान मोदींच्या मार्गावर काही शेतकरी आंदोलक आंदोलन करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे मोदींना काही वेळ आपल्या गाडीतच थांबून राहावं लागलं. त्यानंतर मोदींनी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.
Officials at Bhatinda Airport tell ANI that PM Modi on his return to Bhatinda airport told officials there,“Apne CM ko thanks kehna, ki mein Bhatinda airport tak zinda laut paaya.” pic.twitter.com/GLBAhBhgL6
— ANI (@ANI) January 5, 2022
‘पंजाब सरकारने दाखवून दिलं की ते विकासविरोधी आहेत आणि आपल्या स्वातंत्र्यसेनानींबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक होती. हे खूप चिंताजनक आहे. पंतप्रधान मोदी हे देशाचे सुपुत्र सरदार भगतसिंह आणि अन्य शहीदांना श्रद्धांजली अर्पण करणार होते. सोबतच राज्यातील प्रमुख विकासकामांचं भूमिपूजन ते करणार होते’.
पंजाब की कांग्रेस सरकार ने ऐसा करने में इस बात की भी परवाह नहीं की कि देश के प्रधानमंत्री @narendramodi जी को देश के महान सपूत सरदार भगत सिंह और अन्य शहीदों को श्रद्धांजलि देनी थी और राज्य में प्रमुख विकास कार्यों की आधारशिला रखनी थी।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 5, 2022
‘पंजाबमधील काँग्रेस सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाच्या भीतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम होऊ न देण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली’, असा गंभीर आरोप नड्डा यांनी आपल्या ट्वीटद्वारे केलाय.
पंजाब की कांग्रेस सरकार ने आगामी विधान सभा चुनाव में जनता के हाथों करारी हार के डर से पंजाब में देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के कार्यक्रमों को विफल करने के लिए हर संभव कोशिश की।प्रधानमंत्री की सुरक्षा से खिलवाड़ किया गया।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 5, 2022
इतर बातम्या :