PM Modi | पंतप्रधान मोदींच्या सभेतील एक भावनिक प्रसंग, तो फोटो पाहताच मोदी त्या लहान मुलीला म्हणाले….

| Updated on: Nov 03, 2023 | 10:48 AM

PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक जाहीर सभा पार पडली. त्यात एक भावनिक प्रसंग घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक संवेदनशील व्यक्तीमत्व आहे. जाहीर सभा सुरु असतानाही त्यांच चौफेर लक्ष असतं. अशाच एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्केचवर लक्ष गेलं.

PM Modi | पंतप्रधान मोदींच्या सभेतील एक भावनिक प्रसंग, तो फोटो पाहताच मोदी त्या लहान मुलीला म्हणाले....
PM Modi Meeting
Follow us on

कांकेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. पंतप्रधान मोदींच स्टेजवरुन भाषण सुरु होतं. त्याचवेळी समोरच्या गर्दीतील एका लहान मुलीकडे स्केच होतं. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो होता. तिने स्केच असलेला तो फोटो वर उंचावला. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्या मुलीकडे पाहिलं. ते लगेच म्हणाले की, ‘मी तुझ स्केच पाहिलय. खूप सुंदर चित्र काढलय’. पंतप्रधान मोदी त्या मुलीला म्हणाले, “माझा तुला आशीर्वाद आहे. तू बऱ्याच वेळापासून उभी आहेस. त्यामुळे तू थकशील” पंतप्रधान मोदींनी तिथे तैनात जवानांना सांगितलं की, “ती मुलगी फोटो देत असेल तर तो घ्या. माझ्यापर्यंत पोहोचवा. मुली तू तूझं नाव, पत्ता व्यावर लिहून दे. मी तुला जरुर पत्र लिहीन”

पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचे शब्द ऐकताच मुलीचा चेहरा आनंदाने फुलला. मोदींच्या या शब्दानंतर मुलगी आनंदात दिसली. लोकांनाही पंतप्रधानांची ही कृती खूप भावली. एका लहान मुलीबद्दल पंतप्रधानांनी जी प्रेम, आपुलकी दाखवली त्यामुळे तिथे असलेल्या लोकांच्या मनातही पंतप्रधानांबद्दलचा आदर वाढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात विजय संकल्प रॅलीला संबोधित करत होते. छत्तीसगडमध्ये भाजपाला समर्थन मिळताना दिसतय. कांकेरमध्ये ती झलक दिसून आली. छत्तीसगडची एक वेगळी ओळख प्रस्थापित करण्याचा आणि देशाला टॉप राज्यात आणण्याचा भाजपाचा संकल्प आहे.

‘पाच वर्षात काँग्रेस नेत्यांचे बंगले आणि कार यांचाच विकास’

“छत्तीसगडच्या विकासासाठी राज्याची जनता आणि भाजपाने मिळून काम केलय. जो पर्यंत काँग्रेसच सरकार होतं, तो पर्यंत ते भाजपाशी दुश्मनी काढत राहिले. पण, तरीही आम्ही राज्याच्या विकासासाठी काम केलय” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “मागच्या 5 वर्षात काँग्रेस सरकार कसं अपयशी ठरलं ते तुम्ही पाहिलं. मागच्या पाच वर्षात काँग्रेस नेत्यांचे बंगले आणि कार यांचाच विकास झाला” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.