नवी दिल्ली | 7 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा सुरु आहे. राज्यसभेत या चर्चेसाठी 14 तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 40 जागासुद्धा पार करणार नाही. काँग्रेस पक्ष विचार करण्याच्याही पलिककडे आउटडेटेड झाली आहे. काँग्रेस पक्षाचा विचार जुना झाला आहे. त्यांनी त्यांचे कामही आउटसोर्स केले आहेत. एवढा मोठा पक्ष, एवढे वर्ष राज्य करणारा पक्ष, काही वेळातच अशी अधोगती. आम्हाला तुमच्याप्रती सहानुभूती आहे. पण डॉक्टर काय करणार, रुग्ण स्वत:… पुढे काय बोलू?”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
“ज्या काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोठी लोकशाहीचा गळा घोटला, जिने लोकशाहीने निवडून आलेल्या सरकारांना बरखास्त केलं, ज्या काँग्रेसने देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या मर्यादांना जेलमध्ये बंद केल्या, ज्यांनी वृत्तपत्रांना टाळे लावण्याचे प्रयत्न केले होते. आता उत्तर आणि दक्षिण भागांना तोडण्यासाठी काहीही वक्तव्ये केली जात आहेत. ही काँग्रेस आम्हाला लोकशाहीवर प्रवचन देत आहे. तुम्ही भाषेच्या नावाने देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहात. ज्यांनी ईशान्य भारताला हिंसेत ढकललं आहे, ज्यांनी नक्षलवाद हे एक आव्हान तयार करुन सोडलं आहे. देशाची जमीन शत्रूंच्या नावाने केली. देशाचं सर्व आधुनिकरण रोखलं. आम्हाला आज राष्ट्रीय सुरक्षेवर भाषण देत आहोत, जे स्वातंत्र्यानंतर नेहमी कन्फ्यूज राहिले आहेत”, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
“काँग्रेस 10 वर्षात देशाला 11 व्या नंबरवर घेऊन आळी. आम्ही 10 वर्षात देशाला 5 व्या नंबरवर घेऊन आलो. ही काँग्रेस आम्हाला आर्थिक नीतीवर भाषण ऐकवत आहे. ज्यांनी सामान्य वर्गाच्या गरीबांना कधी आरक्षण दिलं नाही. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही, ज्यांनी देशाचे रस्त्यांना आपल्याही कुटुंबियांच्या नावे दिली, ते आम्हाला सामाजिक न्यायावर भाषण देत आहेत. ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांवर कोणतीच गॅरंटी नाही, आपल्या रणनीतीची गॅरंटी नाही, ते मोदी गॅरंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
“काँग्रेसने चुकीचे समज पसरवले, याचा परिणाम काय झाला? भारताच्या संस्कृती आणि सभ्यता मानणाऱ्यांना हीन भावनेतून बघितलं गेलं. त्यामुळे आपल्या भूतकाळावर अन्याय झाला. आपल्याच संस्कृतीला शिवीगाळ देतात. तुम्ही आपल्याच संस्कृतीला शिवीगाळ दिली तर तुम्ही प्रोगेसिव्ह आहात अशाप्रकारचं नरेटिव्ह तयार केलं गेलं. त्याचं नेतृत्व कुठे होतं ते दुनियेला माहिती आहे. दुसऱ्या देशातून आयात करायचं आणि भारतीय वस्तूंना दुय्यम दर्जा द्यायचा. ही लोकं आजही वोकल फॉर लोकल बोलायला कचरतात”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.