PM Modi in Kanpur: उत्तर प्रदेशात सर्वांनी नोटांचा डोंगर पाहिला, आता सपाचं मौन का?; मोदींचा खरमरीत सवाल

| Updated on: Dec 28, 2021 | 5:55 PM

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्या घरात नोटांचं घबाड सापडल्याने त्यावरून सपा आणि भाजपमध्ये जुंपली आहे.

PM Modi in Kanpur: उत्तर प्रदेशात सर्वांनी नोटांचा डोंगर पाहिला, आता सपाचं मौन का?; मोदींचा खरमरीत सवाल
PM Narendra Modi
Follow us on

कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूर येथील अत्तर व्यापारी पीयूष जैन याच्या घरात नोटांचं घबाड सापडल्याने त्यावरून सपा आणि भाजपमध्ये जुंपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणावरून थेट सपावर हल्ला केला आहे. कानपूरमध्ये सर्वांनी नोटांचा डोंगर पाहिला. आता यावर समाजवादी पार्टीचं मौन का आहे? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

कानपूरच्या निराला नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जनसभा पार पडला. काही दिवसांपूर्वी बॉक्स भरून भरून नोटा सापडल्या. आता हे लोक म्हणतील आम्हीच हे केलं, असा टोला लगावतानाच मागच्या सरकारने भ्रष्टाचाराचं जे अत्तर शिंपडलं होतं, ते सर्व बाहेर आलं आहे. आता ते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. याचं श्रेय घेत नाहीत. नोटांचा डोंगर सर्वांनी पाहिला. हीच सपाची कमाई आहे, असं मोदी म्हणाले.

डबल स्पीडने काम सुरू

यावेळी मोदींनी मागच्या सरकारवरही हल्ला चढवला. सध्या उत्तर प्रदेशात डबल इंजिनचं सरकार सुरू आहे. मागच्या कालखंडात जे नुकसान झालं, ते भरून काढण्याचं काम हे सरकार करत आहे. आम्ही डबल स्पीडने काम करत आहोत. डबल इंजिनचं सरकार ज्या कामाचा शिलान्यास करते ते काम पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

अमित शहांचा हल्लाबोल

दरम्यान, या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कानपूरमध्ये सापडलेल्या घबाडावरून समाजवादी पार्टीवर जोरदार हल्ला केला होता. आज समाजवादी पार्टीची बोबडी वळली आहे. कारण त्यांच्याशी संबंधित व्यक्तीचा हा पैसा आहे. अखिलेशजी, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही काळा पैसा नष्ट करण्याचा नाराच दिलेला आहे. आज रेड पडल्याने ते अस्वस्थ आहेत. समाजवादी अत्तर बनविणाऱ्याच्या घरातून अडीचशे कोटी रुपये सापडले आहेत, असं शहा यांनी म्हटलं होतं.

रोकडच नव्हे सोनेही जप्त

दरम्यान, हजारो कोटींचा मालक असलेल्या पियुष जैनच्या घरावर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. परफ्युम व्यावसायिक पीयूष जैन याला पोलीस कोठडीत जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले, तेथे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. तपासात कोरोनाची पुष्टी न झाल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

 

संबंधित बातम्या:

Kanpur raid Piyush Jain: अब्जोंची कॅश बाळगणारे पियुष जैन आता तुरुंगात झोपत आहेत फरशीवर

बिलाच्या सुतावरून गाठला 257 कोटींचा स्वर्ग; तळघरात माया, त्याच्या 500 चाव्या, अत्तर व्यापाऱ्याच्या कारनाम्याचा दरवळ

IT Raid: पियुष जैनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जाणून घ्या ब्लॅकमनीचे संपूर्ण सत्य