“मागच्या दोन दिवसांपासून मी बघतोय पराजयाचा हळूहळू स्वीकार होतोय. तसच विजय सुद्धा स्वीकारला जातोय. काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमची 10 वर्ष झाली अजून 20 वर्ष बाकी आहेत. एक तृतीयांश पूर्ण झालं, दोन तृतीयांश अजून बाकी आहे. त्यांच्या तोंडात तूप साखर” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलत आहेत. “मागची 10 वर्ष अखंड, एकनिष्ठ अविरत सेवाभावनेने केलेल्या कार्याला देशातील जतेनेने मनापासून समर्थन दिल. आशिर्वाद दिला आहे. या निवडणुकीत देशवासियांच्या विवेक बुद्धीचा गर्व वाटतो, त्यांना प्रोपगंडाला हरवलं. देशातील जनतेने परफॉर्मन्सला प्राथमिकता दिलीय. भ्रमाच्या राजकारणाला देशवासियांनी धुडकावलय” असा पंतप्रधान मोदी म्हणाले.
“विश्वासाच्या राजकारणावर विजयाची मोहोर उमटवलीय. माझ्यासारखे या देशात बरेच लोक आहेत. सार्वजनिक जीवनात त्यांच्या कुटुंबातून गावाचा सरपंच, प्रधान कोणी नव्हतं. राजकारणाशी काही संबंध नव्हता. पण आज ते लोक अनेक महत्त्वाच्या पदावर पोहोचून आज देशाची सेवा करतायत. याच्यामागच कारण आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान.त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना संधी मिळाली” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘संविधान आमच्यासाठी फक्त आर्टिकल कम्पायलेशन नाहीय’
“माझ्यासारखे अनेक लोक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे त्यांना इथपर्यंत येण्याची संधी मिळाली. तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची संधी मिळाली. त्यावर जनता जर्नादनने मोहोर उमटवली” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “संविधान आमच्यासाठी फक्त आर्टिकल कम्पायलेशन नाहीय. त्याच स्पिरिट आणि शब्द मुल्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत कुठल्याही सरकारसाठी निती निर्धारणात आमच संविधान दिशादर्शक, मार्गदर्शनाच काम करेल” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
’26 जानेवारी आहे, मग संविधान दिवस कशाला?’
“मी लोकसभेत आमच्या सराकारकडून बोललो. 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करणार. मी हैराण आहे. आज संविधानाच्या प्रती घेऊन जे फिरत आहेत, त्यावेळी त्यांनी विरोध केला, 26 जानेवारी आहे, मग संविधान दिवस कशाला? असा त्यांचा मुद्दा होता. संविधान दिनाच्या माध्यमातून देशातील शाळा, कॉलेजेसमध्ये संविधाना मागची भावना, संविधान रचनेत काय भूमिका होती? देशातील गणमान्य महापुरुषांनी कुठल्या कारणामुळे काही गोष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. या विषयी शाळा, कॉलेजेसमध्ये विस्ताराने चर्चा झाली पाहिजे. निंबध स्पर्धा झाली पाहिजे. संविधान सर्वात मोठी प्रेरणा राहील, यासाठी प्रयत्न केले. देशाच्या कानाकोपऱ्यात संविधानाच्या भावनेला, संविधानाच्या विषयाची देशाला जाणीव करुन देण्याचा प्रयत्न आहे” असं पीएम मोदी म्हणाले.