नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या 21 एप्रिल रोजी लालकिल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. गुरु तेग बहादूर (Sikh guru Tegh Bahadur) यांच्या 400व्या प्रकाश पर्वाच्या पार्श्वभूमीवर मोदी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. गुरु तेग बहादूर यांच्या 400व्या प्रकाश पर्वानिमित्ताने खास नाणं आणि टपाल जारी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 एप्रिल रोजी लाल किल्ल्यावर गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या (400th Parkash Parva) कार्यक्रमात भाग घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं. त्यामुळे मोदी लाल किल्ल्यावरून काय भाषण करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनाच्याच दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असतात. यंदा प्रथमच 21 एप्रिल रोजी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून संबोधित करणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
या शुभ दिनी 400 ‘रागी’ (शीख संगीतकार) शब्द किर्तन करणार आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने केलं आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या सहकार्याने हे आयोजन केलं जात आहे. या सोहळ्याला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपखंडातील आणि विदेशातील महत्त्वाचे पाहुणे येणार आहेत. आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत प्रकाश पर्व सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्या निमित्त जे नाणं जारी करणार आहे. त्याची किंमत 400 रुपये एवढी असेल. गुरु तेग बहादूर यांचा जन्म 1621मध्ये गुरू महल, अमृतसर इथे झाला होता. दिल्लीत ज्या ठिकाणी गुरू तेग बहादूर शहीद झाले होते. तिथेच त्यांची समाधी आहे. या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो श्रद्धाळू येत असतात. गुरू तेग बहादूर हे शीखांचे नवे गुरू होते. गुरू नानक यांनी सांगितलेल्या मार्गाचा त्यांनी अवलंब केला. इस्लामचा स्वीकार केला नाही म्हणून औरंगजेबाने सर्वांसमोर 1675मध्ये त्यांचे मुंडके उडवले होते. मानवी मूल्य, आदर्श आणि सिद्धांतासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ते गुरु होते. त्यांचं स्थान जगाच्या इतिहासात अतुलनीय आहे. त्यांनी शीख धर्माच्या प्रचार प्रसारासाठी अनेक ठिकाणी दौरे केले. त्यात वाराणासी, पटणा सारख्या शहरांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
CDS : देशाचे नवे सीडीएस कोण होणार? केंद्राकडून नियुक्तीबाबत तातडीने हलचाली सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हनुमानजींच्या 108 फूट प्रतिमेचे अनावरण
Sharad Pawar on Raj Thackeray: कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरवली जात असेल तर हरकत नाही: शरद पवार