PM Kisan Samman Nidhi 14th Installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 आणि 15 नोव्हेंबरला दोन दिवसीस झारखंड दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना दिवाळी भेट देतील. पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता देतील. एकूण 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये ट्रान्सफर होणार आहेत. आतापर्यंत या योजनेतंर्गत 14 हफ्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. DBT माध्यमातून त्यांच्या खात्यात 2.62 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. त्याशिवाय पीएम भगवान बिरसा मुंडा यांच जन्मस्थळ असलेल्या उलिहातु गावात जातील. तिथे भगवान बिरसा मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील.
पीएम नरेंद्र मोदी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी 15 नोव्हेंबरला खुंटी येथे जातील. त्याआधी 14 नोव्हेंबरला रांची येथे रोड शो करतील. या कार्यक्रमा दरम्यान पीएम मोदी ‘प्रधानमंत्री विशेष कमजोर जनजातीय समूह (पीएम पीवीटीजी) मिशन’ लॉन्च करतील. पीएम पीवीटीजी मिशनसाठी जवळपास 24 हजार कोटी रुपयांच बजेट आहे. या मिशनमध्ये पीवीटीजी कुटुंब, रस्ते, दूरसंचार कनेक्टिविटी, वीज, सुरक्षित आवास या पायाभूत सुविधांसाठी योजना बनवल्या आहेत.
7200 कोटी रुपयांच्या योजनांच उद्घाटन
या सोबतच कुटुंबांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि आजीविकेची संधी मिळतील. पंतप्रधान जवळपास 7200 कोटी रुपयांच्या योजनांच उद्घाटन करतील. यात रेल्वे, रस्ते, शिक्षण, कोळसा, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस योजनेचा समावेश आहे. पीएम नरेंद्र मोदी बोकारोमध्ये पेट्रोलियम तेल आणि स्नेहक (पीओएल) डेपो, नवीन रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करतील.