नवी दिल्ली : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. तर आज हनुमानाची जयंती असून आजचा दिवस चांगला मानला जातो. त्यामुळे सकाळपासूनच देशभरातील हनुमान मंदिरांमध्ये मोठी गर्दी होत आहे. आज शहरांमध्येही मिरवणुका काढण्यात येणार असून, त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र आजच्या दिवसावरून महाराष्ट्रात चांगले रणकंदन माजले असून शिवसेना विरोधात भाजप असे चित्र रंगले आहे. त्यामुळे हनुमान चालीसा वाचनावरून सुरू झालेला वाद काही करता कमी होताना दिसत नाही. अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यावरून सध्या राज्यात महाराष्ट्रात चांगलाच वाद रंगलेला आहे. यादरम्यान गुजरातमधील मोरबी येथे हनुमान जयंतीच्या औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 108 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे (Hanuman statue) अनावरण केले. हे अनावरण आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.
आज हनुमानाची जयंतीच्या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा त्यांनी ट्विटरवरून दिल्या आहेत. आपल्या ट्विट संदेशात मोदी म्हणाले की, हनुमान जयंतीचा हा मंगल प्रसंग भगवान हनुमानाची दयाबुद्धी आणि समर्पणाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्यात हनुमंताचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली. हनुमानाचे जीवन व त्यांचे आदर्श आपणा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण केले. त्याचबरोबर पीएमओच्या म्हणण्यानुसार, भगवान हनुमानाशी संबंधित चार धाम प्रकल्पांतर्गत हनुमानाची मूर्ती देशाच्या चारही दिशांना बसवली जाणार असून त्याचे कामही सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या मालिकेतील पहिली मूर्ती 2010 मध्ये उत्तर दिशेला म्हणजेच शिमला येथे स्थापित करण्यात आली होती, असेही सांगण्यात आले आहे.
Today, we mark the special occasion of Hanuman Jayanti. In Morbi, at 11 AM, a 108 feet statue of Hanuman ji will be inaugurated. I am honoured to be getting the opportunity to be a part of this programme via video conferencing. https://t.co/qjvLIHWWiO pic.twitter.com/kbHcIxd90Z
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2022
शक्ति, साहस और संयम के प्रतीक भगवान हनुमान की जयंती पर सभी देशवासियों को अनेकानेक शुभकामनाएं। पवनपुत्र की कृपा से हर किसी का जीवन बल, बुद्धि और विद्या से सदा परिपूर्ण रहे।
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2022
PM Narendra Modi unveils a 108 ft statue of Hanuman ji in Morbi, Gujarat through video conferencing, on #HanumanJayanti. This statue is the second of the 4 statues being set up in 4 directions across the country, as part of #Hanumanji4dham project pic.twitter.com/jWcJLu2xNI
— ANI (@ANI) April 16, 2022