मुंबई : कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा चीन चर्चेत आला आहे. कारण चीनमध्ये सध्या एका आजाराने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. चीनमध्ये हा नवीन आजार पाय पसरु लागला आहे. चीनच्या उत्तर-पूर्व भागात असलेल्या लिओनिंग प्रांतातील मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढत आहे. मुलांमध्ये फुफ्फुसांना सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे अशी प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये पसरणाऱ्या न्यूमोनियाबाबत एम्सकडून एक मोठे अपडेट आले आहे. एम्सने यासाठी चीनला पूर्णपणे जबाबदार धरले आहे.
चीनमधील मुलांमध्ये वेगाने पसरणाऱ्या न्यूमोनियाबाबत एम्सच्या मदर अँड चाइल्ड ब्लॉकचे एचओडी डॉ. एसके काबरा म्हणतात की, श्वसनाचे आजार आणि न्यूमोनियाने ग्रस्त मुलांची संख्या अचानक वाढली आहे. आतापर्यंत ज्या प्रकारची प्रकरणे समोर आली आहेत, ती पाहता त्यात हवामान ही कारण असू शकतं.
इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, रेस्पिरेटरी सिंसिटिअल व्हायरस (RSV) आणि SARS-CoV-2 हे चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या वाढीसाठी जबाबदार आहेत. आतापर्यंत, या रहस्यमय आजाराशी संबंधित कोणत्याही प्रकारचे नवीन विषाणू आढळले नाहीत. यासाठी WHO ने मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया देखील जबाबदार धरला आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा एक सामान्य जिवाणू संसर्ग आहे जो सहसा लहान मुलांना प्रभावित करतो.
डॉ. काबरा म्हणाले की आमचा विश्वास आहे की ही संख्या सामान्यपेक्षा खूप जास्त आहे परंतु चीनमध्ये घेतलेले काही निर्णय यासाठी जबाबदार असू शकतात. खरं तर, चीनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच लॉकडाऊन उठवला होता. अशा परिस्थितीत लॉकडाऊन उठल्यानंतर पहिल्या हिवाळ्यात लोक चीनमध्ये फिरत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना ही समस्या भेडसावत आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर पाच वर्षांखालील मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती नसल्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरत आहे.