राहुला गांधींच्या पायी मार्चला परवानगी नाकारली; दिल्लीत कलम 144 लागू

| Updated on: Dec 24, 2020 | 11:05 AM

कृषी कायद्याला विरोध म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनाकडे पायी मार्च काढणार आहे. (police denied permission to Rahul Gandhi's march against farm laws)

राहुला गांधींच्या पायी मार्चला परवानगी नाकारली; दिल्लीत कलम 144 लागू
Follow us on

नवी दिल्ली: कृषी कायद्याला विरोध म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनाकडे पायी मार्च काढणार आहे. राहुल यांच्या या मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी केवळ तीनच नेत्यांना राष्ट्रपती भवनाकडे जाण्यास परवानगी दिली आहे. तसेच दिल्लीत 144 कलम लागू करून जमाव बंदीही लागू केली आहे. त्यामुळे राहुल गांधी पायी मार्च काढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (police denied permission to Rahul Gandhi’s march against farm laws)

राहुल गांधी आज कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रपती भवनाच्या दिशेने पायी मार्च काढणार आहेत. पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली आहे. आम्ही या मार्चला परवानगी दिलेली नाही. ज्या नेत्यांना राष्ट्रपती भवनाने भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यांनाच केवळ राष्ट्रपती भवनाकडे जाता येणार आहे, असं नवी दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्ताने सांगितलं. राहुल गांधी हे काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढणार आहेत. यावेळी ते राष्ट्रपतींना 2 कोटी शेतकऱ्यांचं निवेदन देणार आहेत.

त्याआधी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. आम्ही राष्ट्रपती भवनाच्या दिशेने मार्च करणार आहोत. सरकारने कायदा तयार करताना शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. सरकारला दिशा देण्याचं काम राष्ट्रपती करत असतात. त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या भावना त्यांना सांगणार आहोत, असं थरुर म्हणाले होते.

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 29वा दिवस आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरु आहे. यादरम्यान सरकार आणि कृषी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. पण अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार कृषी कायद्यात सुधारना करण्यास तयार आहे. मात्र शेतकरी संपूर्ण कायदाच रद्द करा, या मागणीवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसनं यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचाच भाग म्हणून राहुल गांधी आज दुसऱ्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत आहेत.

सर्व पक्षीय नेत्यांनी घेतली होती भेट

या आधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची भेट घेतली होती. 9 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या 5 नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यात राहुल गांधी यांच्याही समावेश होता. त्यावेळी देशाच्या विकासात शेतकऱ्यांचं योगदान प्रचंड आहे. ते दिवस रात्र घाम गाळून देशाला विकासाच्या मार्गावर नेत आहेत, असं सांगतानाच केंद्र सरकारने आणलेले कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे ते रद्द करण्यात आले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षाने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, सीपीएम नेते सीताराम येचुरी, सीपीआय महासचिव डी राजा आणि डीएमके नेते टी. के. एस. इलेनगोवन उपस्थित होते. (police denied permission to Rahul Gandhi’s march against farm laws)

 

संबंधित बातम्या:

राहुल गांधी पुन्हा एकदा राष्ट्रपतींना भेटणार, कारण काय?

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदा रद्द करा; विरोधकांची राष्ट्रपतींकडे मागणी

MSP कायम ठेवणार, सरकारचं आश्वासन; कायदेच रद्द करा, शेतकरी मागणीवर ठाम

(police denied permission to Rahul Gandhi’s march against farm laws)