केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वादग्रस्त ठरलेली प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे आयएएस रद्द केले. त्यानंतर पूजा खेडकर हिचा जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला. सर्व काही विरोधात असून आता पूजा खेडकर यूपीएससी विरोधात उच्च न्यायालयात पोहचली आहे. यूपीएससीने आयएएस उमेदवारी रद्द केल्याच्या विरोधात पूजा खेडकर हिने याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पूजा खेडकर हिला नोटीस बजावणाऱ्यांना तिने पक्षकार केले आहे. या याचिकेत पूजा खेडकरने यूपीएससी, केंद्र सरकारचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, मुसरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी, पुणे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले आहे. त्यामुळे पूजा खे़डकर प्रकरण आता न्यायालयातही चर्चेत येणार आहे.
पूजा खेडकर हिचे विविध प्रकरण उघड झाले होते. पूजा खेडकर हिचे अपंग प्रमाणपत्र, वडील निवृत्त आयएएस असताना घेतलेले क्रिमिलेअर प्रमाणपत्र यावरुन वादळ उठले. पूजा खेडकर विरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर यूपीएससीने चौकशी करुन तिने फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले. यामुळे तिची उमेदवारी रद्द केली. आता पूजा खेडकर उच्च न्यायालयात पोहचली आहे. तिने याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा काही दिवस चर्चेत राहणार आहे.
Which #PujaKhedkar has approached the High Court? Khedkar Puja Deeliprao, Puja Deelip Khedkar or Puja Manorama Dilip Khedkar? Puja Khedkar has approached the Delhi High Court against UPSC's cancellation of her candidacy. The organizations that issued a notice to Puja Khedkar have… pic.twitter.com/vLg6Qtz6RA
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) August 5, 2024
दिल्लीतील न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला गेल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. परंतु दिल्ली पोलिसांनी ती भारताच असल्याचे म्हटले. दिल्ली पोलिसांनी तिच्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार, एम्स आणि मसुरी सेंटरकडून माहिती मागितली आहे. आता तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे पूजा खेडकर देश सोडून गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पूजा खेडकरची आई मनोरमा दिलीप खेडकर हिची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे. शुक्रवारी पुणे न्यायालयाने मनोरमा खेडकरचा जामीन मंजूर केला होता. मुळशीमधील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमवकावल्या आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 14 दिवसांच्या आधीच त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांना येरवडा कारागृहातून सोडण्यात आले. यावेळी त्यांची नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते.
हे ही वाचा
एक होती IAS पूजा खेडकर! अधिकारी बनवण्याचा रुबाब, कॅबिन अन् अंबर दिव्याची घाई, आता सर्वच गमावून बसली