जातीयवाद, घराणेशाही आणि लांगूलचालन… या तीन राक्षसांचा नायनाट करा; प्रवासी गुजराती पर्वमधून अमित शाह यांची हाक

| Updated on: Oct 15, 2022 | 2:51 PM

लोकशाहीवर संपूर्ण समाजाचा विश्वास निर्माण करण्याचं काम मोदींनी केलं आहे. प्रत्येक घरात शौचालय, वीज, बँक अकाऊंट उघडण्याचे काम मोदींनी केलं आहे.

जातीयवाद, घराणेशाही आणि लांगूलचालन... या तीन राक्षसांचा नायनाट करा; प्रवासी गुजराती पर्वमधून अमित शाह यांची हाक
जातीयवाद, घराणेशाही आणि लांगूलचालन... या तीन राक्षसांचा नायनाट करा; प्रवासी गुजराती पर्वमधून अमित शाह यांची हाक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये (Ahmedabad) आजपासून तीन दिवसीय प्रवासी गुजराती पर्व-2022ला (Pravasi Gujarati Parv 2022) सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीला अमृत काळासारखं साजरं करण्याचा संकल्प करूया, असं आवाहन करतानाच देशातून जातीयवाद, घराणेशाही आणि लांगूलचालन या तीन राक्षसांचा नायनाट झालाच पाहिजे, असं मत अमित शाह यांनी व्यक्त केलं. या प्रवासी गुजराती पर्वाला देश विदेशातील विविध क्षेत्रातील 2500 हून अधिक गुजराती सहभागी झाले आहेत.

देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क टीव्ही9 मराठी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्स इन नॉर्थ अमेरिका (एआयएएनए)ने या सोहळ्याचे आयोजन केलं आहे. गुजराती उद्योग आणि गौरवाचा उत्सव साजरा करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देशाच्या समृद्धीत गुजराती समाजाचं मोठं योगदान आहे. टीव्ही9 ने हा सोहळा घडवून आणल्याबद्दल आणि गुजरातींना सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. गुजरातने एक असं मॉडल देशात आणलं. त्यामुळे संपूर्ण देश प्रेरित झाला आणि देशात बदल घडून आला, असं अमित शहा म्हणाले.

हे सुद्धा वाचा

न्यू इंडियामध्ये गुजरातची मोठी भूमिका राहिली आहे. तुम्ही सर्व गुजरातचे रहिवासी आहात. गुजरातमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मोदींनी मोठं योगदान दिल्याचं तुम्हा सर्वांना माहीत आहे. 1985 पूर्वीच्या गुजरातची मी तुम्हाला आठवण करून देतो. त्यावेळी लोकांचा अधिक तर काळ कर्फ्यूमध्येच जात होता. वीजही काही तासांसाठी येत होती. रस्त्यांचं जाळं पसरलेलं नव्हतं. पण मोदी आले आणि गुजरातला नवी दिशा मिळाली, असं त्यांनी सांगितलं.

गुजरात हे शांत राज्य आहे. दहशतवादाविरोधात आपण झिरो टॉलरन्सचं धोरण अवलंबलं आहे. मोदींनी आज देशाचा सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडला आहे. आज जगातील कोणताही राष्ट्राध्यक्ष मोदींना भेटायला येतो. तेव्हा मोदी त्यांना गीता भेट देत असतात. मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बताऐंगे असा टोमणा काँग्रेस आम्हाला मारायची. मोदींनी कोणत्याही गोंधळाशिवाय राम मंदिराचा प्रश्न सोडवला. 2024पूर्वीच आयोध्येत गगनचुंबी मंदिर बनणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

गुजरातसाठी केंद्राचा प्लान

  1. मोदींनी देशातील जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. घराणेशाही, जातीयवाद आणि लांगुलचालन… या तीन राक्षसांविरोधात लढण्याचं काम मोदींनी केलं आहे. त्यांनी राज्यात कायद्याची अंमलबजावणी केली आहे.
  2. व्हायब्रंट गुजरात, वनबंधू योजना, सागर खेडो विकास योजना, शेतकरी आणि महिलांसाठीच्या योजना आणून मोदींनी विकासाचा प्लान तयार केला आहे.
  3. लोकशाहीवर संपूर्ण समाजाचा विश्वास निर्माण करण्याचं काम मोदींनी केलं आहे. प्रत्येक घरात शौचालय, वीज, बँक अकाऊंट उघडण्याचे काम मोदींनी केलं आहे.
  4. आयुष्यमान योजनेअंतर्गत लोकांपर्यंत सरकारने आरोग्याच्या सुविधा पोहोचविल्या आहेत. भारत कोरोनाचा सामना करू शकणार नाही, असं सांगितलं जात होतं. मात्र, मोदींच्या नेतृत्वात आपण कोरोनाचा यशस्वी सामना केला आहे.
  5. कोरोना काळात मोदी सरकारने लोकांना रेशन दिलं. लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या.
  6. गुजरातेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आली. पूर्वी पोरबंदर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. वर्षाचे अनेक दिवस पोरबंदरमध्ये कर्फ्यू असायचा. बॉर्डरवरील राज्य असल्याने या ठिकाणी सर्रासपणे स्मगलिंग व्हायची. मात्र, तुम्हाला सांगतो, गेल्या 20 वर्षात मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी एकदाही कर्फ्यू लागला नाही.