मुंबई : महाराष्ट्र (maharashtra rain update) आणि दिल्लीत (Delhi-NCR Rain) कालपासून पाऊस सुरु झाल्यापासून लोकांच्यामध्ये आनंद पाहायला मिळत आहे. परंतु हा मान्सून पाऊस नसून हा मान्सूनपूर्व पाऊस (latest Monsoon Update) असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. दिल्लीत शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली आणि मुंबईत पुढचे काही दिवस अशाचं पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. कालच्या पावसामुळे तापमान सुध्दा चांगलचं खाली गेलं आहे. प्रत्येकवर्षी मान्सूनकडून एका सेट पॅटर्नची अपेक्षा असते. परंतु यावर्षी तशी काय अपेक्षा करता येणार नाही. यंदा चक्रीवादळ बिपरजॉयचा मान्सूनच्या वेगावर मोठा परिणाम झाला असल्याचं सुद्धा अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
यावर्षी पावसाची गती कमी झाली
मान्सून पहिल्यांदा केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात दाखल होतो. देशात दक्षिण भागात पहिल्यांदा पाऊस होतो. त्यानंतर दक्षिण-पश्चिम भागातून मान्सून पाऊस पुढे सरकतो. तिथून पुढे सरकल्यानंतर संपूर्ण देशात पाऊस सुरु होतो. देशातील काही राज्यातील इतर मागच्या पावसाळ्याची तुलना केल्यानंतर तिथली पावसाची गती कमी झाली आहे.
मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, कश्मीर आणि लडाख, चंडीगढ आणि दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकण्यास सध्या परिस्थिती अनुकूल झाली आहे. पुढच्या 48 तासात गुजरात, राजस्थान आणि पंजाब राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याकडून येलो अलर्ट
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढच्या आठवड्यात हा पाऊस असाचं सुरु राहणार आहे. काल दिल्लीतलं तापमान 37.2 डिग्री सेल्सियस होतं. पाऊस पडल्यानंतर तिथलं तापमान खाली गेलं आहे. सध्या तिथं 30.4 डिग्री सेल्सियस तापमान दाखवत आहे. हवामान खात्याकडून पुढच्या सहा दिवसांसाठी उत्तर पश्चिम भारतात येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात तापमान कमी आणि जास्त होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातल्या नाशिक, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.