India-Maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. भारत तरी देखील मालदीवला मदत करत आहे. भारताने आपल्या शेजारील राष्ट्रांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. भारताच्या विरोधात भूमिका घेऊन तेथे सत्तेत आलेले मोहम्मद मुइज्जू हे चीन समर्थक मानले जातात. त्यामुळेच ते चीनला जवळ करुन भारतविरोधी वक्तव्य करत आहे. मालदीववर चीनचं मोठं कर्ज आहे. चीन त्यांना यामध्ये सवलत दिली अशी त्यांची अपेक्षा आहे. पण चीन नेहमीच छोट्या देशांनी कर्जबाजारी करुन त्यांना गुलाम करत आला आहे. पण चीन खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत ते मालदीवच्या लक्षात आलेले नाही.
मालदीवमध्ये आता संसदीय निवडणुका होत आहेत. पण या निवडणुकीत ही भारताचा उल्लेख केला जात आहे. मालदीवमध्ये २१ एप्रिल रोजी संसदीय निवडणुका होणार आहेत. यादरम्यान मुइज्जू निवडणूक प्रचारात भारतीय सैनिकांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करताना दिसत आहेत.
मुइज्जू म्हणाले की, भारतीय सैनिकांची दुसरी तुकडीही 9 एप्रिल रोजी मालदीवमधून निघाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लष्कराची ही तुकडी तिथे डॉर्नियर विमान चालवत असे. मुइज्जू सरकारच्या इंडिया आऊट मोहिमेअंतर्गत भारतीय सैनिकांना मालदीव सोडून जाण्यास सांगितले आहे.
मालदीव आणि भारत यांच्यात करार झाला होता. पण मुइज्जू यांनी तो करार देखील रद्द केला आहे. त्यामुळे भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले आहेत.
मालदीवमध्ये सुमारे 88 भारतीय सैनिक दोन हेलिकॉप्टर आणि एका विमानाचे ऑपरेशन हाताळत होते. भारतीय हेलिकॉप्टर आणि विमाने मालदीवमध्ये मानवतावादी मदत आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मालदीवच्याच लोकांना मदत करत आहेत. पण तरी देखील मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्षांना ही मदत नको आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय सैनिकांना माघारी बोलवण्याच्या सूचना केल्या होत्या.
भारतानेच 2010 आणि 2013 मध्ये मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि 2020 मध्ये एक लहान विमान भेट दिले होते. यावरून देखील मालदीवमध्ये मोठा गदारोळ झाला होता. मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी तत्कालीन अध्यक्ष सोलिह यांच्यावर ‘इंडिया फर्स्ट’ धोरण अवलंबल्याचा आरोप केला होता.
४ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या भेटीच्या व्हिडिओवर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर वाद अधिक वाढला होता. त्यांन तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं होतं.
सोशल मीडियावर यानंतर भारतातून बायकॉट मालदीव ट्रेंड होऊ लागले. याचा मालदीवच्या पर्यटनाला मोठा झटका बसला आहे. भारतीयांना मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीला जाण्याचा प्लान आखला. अनेकांनी मालदीवचे तिकीट रद्द केले. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयानुसार, जानेवारी-मार्च 2023 मध्ये 56 हजारांहून अधिक भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते. त्याच वेळी, जानेवारी ते 10 एप्रिल 2024 पर्यंत केवळ 37 हजार भारतीय मालदीवमध्ये गेले. आकडेवारीमध्ये 34% घट दिसून आली.