नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कमांडंटचा पीबीजीचा काळा घोडा विराट (virat) आज 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) परेडनंतर आपल्या अनेक वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाला. राजपथावर 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपताच राष्ट्रपतींचे अंगरक्षक राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना पुन्हा राष्ट्रपती भवनात घेऊन गेले. त्यानंतर विराटच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली. पीबीजी मधला खास घोडा असणाऱ्या विराटच्या उपस्थितीने हा सोहळा स्पेशल बनला. 15 जानेवारीला आर्मी डेच्या पूर्वसंध्येला विराटला आर्मी स्टाफचे चीफ कमंडेशन देण्यात आले. असाधारण सेवेसाठी आणि क्षमतेबद्दल प्रशंसा मिळवणारा विराट हा पहिला घोडा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या समारोपानंतर पीबीजीने विराटच्या निवृत्तीची घोषणा केली. गेल्या 13 वर्षांपासून भारताच्या राष्ट्रपतींना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान हा विराटकडे होता. भारतीय लष्कराने राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाचा चार्जर म्हणून विरटचा विशेष सन्मान केला आहे.
विराट आज निवृत्त झाला आहे. विराटच्या निवृत्तीचा क्षण सर्वांसाठी भाविनिक होता. गेल्या 13 वर्षांपासून भारताच्या राष्ट्रपतींना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान हा विराटकडे होता. आज राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांकडून त्याच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली. विराटने तब्बल 19 वर्ष सेवा बजावली आज अखेर त्याच्या निवृत्तीची घोषणा करण्यात आली.
विराट निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना देखील विराटला गोंजारले. राजपथावर आज 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपताच राष्ट्रपती त्यांच्या भवनाकडे परतण्यासाठी निघाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील त्यांच्यासोबत होते. राष्ट्रपतींना भवनात घेऊन जाण्यासाठी अंगरक्षक येताच पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अंगरक्षकांच्या ताफ्यातील विराटला गोंजारलं हे फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले आहे. विराट आज तब्बल 19 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त झालाय.
Prime Minister @narendramodi with Virat.
? Virat currently in the President’s bodyguard fleet, received Chief of the Army Staff Commendation for exemplary service.#RepublicDay #RepublicDayIndia #RepublicDayParade2022 pic.twitter.com/l70RKWjr9F
— All India Radio News (@airnewsalerts) January 26, 2022
Budget 2022: सरकार हेल्थकेअर क्षेत्रात मोठ्या बदल करण्याच्या तयारीत? काय असणार आहे नेमका प्लान
मुंबईच्या Maladमध्ये Bajran Dal, BJPचं आंदोलन, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Pankaja Munde : केज नगरपंचायतीत पंकजांचा धनंजय मुंडेंना चेकमेट, धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा?