मोदींचा एक झटका, मोहम्मद युनूसकडून ‘यू टर्न’, निर्णय मागे फिरवत दिली ही परवानगी

| Updated on: Sep 22, 2024 | 3:54 PM

narendra modi and muhammad yunus: बांगलादेशात हिस्सा मासे प्रसिद्ध आहेत. दुर्गा पूजा दरम्यान या माशांचे व्यंजन बनवले जातात. शेख हसीना सरकार हिला सद्भावना नीती मानत होता. 2023 मध्ये दुर्गा पूजा दरम्यान बांगलादेशात भारताने 5000 टन हिल्सा माशांची निर्यात केली होती.

मोदींचा एक झटका, मोहम्मद युनूसकडून यू टर्न, निर्णय मागे फिरवत दिली ही परवानगी
narendra modi muhammad yunus
Follow us on

बांगलादेशमध्ये झालेल्या बंडानंतर शेख हसीन यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांची नियुक्ती झाली. परंतु मोहम्मद युनूस सातत्याने भारताविरोधी निर्णय घेत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांना एक झटका दिला आहे. त्यानंतर मोहम्मद युनूस वठणीवर आले आहेत. त्यांनी आपला निर्णय मागे फिरवत भारतातून होणाऱ्या हिल्सा माशांच्या निर्णयातील परवानगी दिली आहे.

आता होणार 3,000 टन हिल्सा माशांची निर्यात

काही दिवसांपूर्वी मोहम्मद युनूस यांनी भारतातून होणाऱ्या हिस्सा माशांची निर्यात बंद करण्याचे आदेश काढले. त्यानंतर भारताने बांगलादेशची राजकीय कोंडी सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीसाठी अमेरिका दौऱ्यावर आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस अमेरिकेत आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूसची भेट टाळली आहे. बांगलादेशकडून घेण्यात येणाऱ्या भारतविरोधी धोरणामुळे ही भेट टाळली. बांगलादेशला त्याची जाणीव होताच बंदी घातलेली हिस्सा माशांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे.

दुर्गा पूजेसाठी हिस्सा माशांचे व्यंजन

बांगलादेशात हिस्सा मासे प्रसिद्ध आहेत. दुर्गा पूजा दरम्यान या माशांचे व्यंजन बनवले जातात. शेख हसीना सरकार हिला सद्भावना नीती मानत होता. 2023 मध्ये दुर्गा पूजा दरम्यान बांगलादेशात भारताने 5000 टन हिल्सा माशांची निर्यात केली होती. या वर्षी युनूस सरकाने आता 3,000 टन हिल्सा माशांच्या निर्यातीस परवानगी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मोदी नाही पण एस.जयशंकर भेट घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोहम्मद युनूस यांची भेट घेणार नाही. परंतु परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री तोहीद हुसैन यांची भेट घेणार आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत चर्चा करणार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या महासभेबाहेर ही भेट होणार आहे. परंतु नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनूस यांची भेट होणार नाही, हे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.