गूगल सर्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल शोधला जातो. आता नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांचा नंबर आणि ई-मेल दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल शेअर केला आहे. तसेच त्यात संपत्तीचा उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, मोदी यांच्या संपत्तीत 2014 ते 2019 च्या दरम्यान 52 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात मोबाईल क्रमांक 89XXXXXX24 दिला आहे. तसेच त्यांचा ई मेल आयडी narendramodi@narendramodi.in दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे तीन कोटी रुपयांची जमा राशी आहे. त्यात जवळपास 53,000 रुपये रोकड आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. 2018-19 मध्ये त्यांचे उत्पन्न 11 लाख रुपये होते. ते 2022-23 मध्ये 23.5 लाख रुपये झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकही घर नाही किंवा त्यांच्या स्वत:ची कारसुद्धा नाही. त्यांच्याजवळ 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी रुद्राक्ष कन्वेंशन सेंटरमध्ये पोहचले. त्यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला. तसेच प्रत्येक बुथवर मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा 370 मतदान जास्त करण्याचे आवाहन केले. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे प्रत्येक बुथवर 370 मतदान जास्त होईल, असे प्रयत्न करण्याचे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघातील (काशी) लोकांचे आभार मानले आहे. आपल्या कार्यकाळात झालेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच तिसऱ्या कार्यकाळात काशीमधील लोकांच्या विकासासाठी अथक प्रयत्न सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरला त्यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह आणि एनडीए सरकार असलेले राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.