काठमांडू : नेपाळ शुक्रवारी मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ नुकसान झालय. अनेक घर कोसळली आहेत. पश्चिम नेपाळमध्ये हा भूकंप झाला. यात नालगड़ म्यूनसिपालटीच्या उपमहापौरांसह 129 नागरिकांचा मृत्यू झालाय. जाजरकोट आणि पश्चिम रुकुमध्ये सर्वाधिक नुकसान झालय. रात्री उशिरा तीव्र भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेश, दिल्ली, पटना, झारखंड आणि बिहारपर्यंत जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक लगेच आपल्या घराबाहेर पळाले. एकच गोंधळ उडाला. जाजरकोटमध्ये सर्वाधिक नुकसान झालाय, अंस जाजरकोट जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक संतोष रोका यांनी सांगितलं. मृतांमध्ये नलगढ नगरपालिकेच्या उपमहापौर सरिता सिंह सुद्धा आहेत, अशी माहिती संतोष रोका यांनी दिली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील भूकंपाच्या या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. “या भूकंपात जे नुकसान झालं, ज्यांनी प्राण गमावले, त्या बद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला. भारत भक्कमपणे एकजुटीने नेपाळी जनतेच्या पाठिशी उभा आहे. आम्ही शक्य ती सर्व मदत करु. ज्या कुटुंबानी या भूकंपात आप्तस्वकियांना गमावलं, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जे जखमी आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Deeply saddened by loss of lives and damage due to the earthquake in Nepal. India stands in solidarity with the people of Nepal and is ready to extend all possible assistance. Our thoughts are with the bereaved families and we wish the injured a quick recovery. @cmprachanda
— Narendra Modi (@narendramodi) November 4, 2023
नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के सामान्य
जाजरकोटमध्ये भूकंपाच केंद्र आहे. इथे 92 नागरिकांचा मृत्यू झालाय. पश्चिम रुकुममध्ये सुद्धा मोठ नुकसान झालय. तिथे 37 जणांनी प्राण गमावलेत. 140 नागरिक जखमी झालेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलय. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याआधी 22 ऑक्टोबरला सकाळी 7.39 मिनिटांची काठमांडू आणि आसपासच्या जिल्ह्यात 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी जिवीतहानी झाली नव्हती. नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के सामान्य समजले जातात.